Wednesday, June 1, 2016

Er Rational musings #543

Er Rational musings #543



"गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग" ची आठवण झाली.



माझा पहिला जाँब बीईएसटी, रिपोर्टिंग टाईम, सकाळी आठ चा पंच. आँफीस पाठकवाडी, जीटी हाँस्पीटल समोर, 1985 ची गोष्ट.



बीईएसटी मध्ये, सप्लाय ब्रँचला मुंबई बाहेरून जाँईन करणाऱ्या इंजिनियर्स ची संख्या प्रचंड. आम्ही मुंबईकर खूपच कमी. कारण पगार कमी, म्हणजे 900 रूपये महिना! (त्यावेळी माझ्या बरोबरचे काँलेजवाले मित्र टाटा पाँवर, बीएसईएस, माझगाव डाँक्स, बीएमसी, लार्सन टूब्रो, गोदरेज, इ ठिकाणी लागले, पगार किमान 2500 ते 3000 रू. कुठे 900 व कुठे 3000?) कुठनं कुठनं उर्वरित महाराष्ट्रातन लोक यायचे बीईएसटीत, तीन चार जणं, एकत्र रहायचे भाड्याने खोली घेवून, कष्टप्रद खरच. हे साधे सरळ लोक.



मिलिंद कुलकर्णी नावाचा, साधा माणूस, कपाळावर गंध बिंध लावून यायचा सकाळी सकाळी. हा साताऱ्याचा होता. आमच्या ग्रूपला व जनरल सर्वांना गुड मॉर्निंग आवर्जून करायचा बिचारा. दररोज आमचा अल्ताफ मिर्झा नेहमीच या एमडी (मिलिंद दत्तात्रय  कुलकर्णी) ला मोठ्याने म्हणायचा - गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग!! एमडी पण बिचारा कसनुसं हसत स्वीकारायचा! (बीईएसटी वालो, तुम्हाला चांगलेच आठवत असेल!!)



इंसिडंटली हा एमडी गोव्यात पणजी मध्ये आँल इंडिया रेडियोत काम करतोय.



व्हाँट्सअँप चा जनक निर्माता हा एमडी कुलकर्णी च असावा याबद्दल माझी खात्री बसत चाललीये.



गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग...

---

मिलिन्न्द काळे, 2nd June 2016

No comments:

Post a Comment