Friday, June 3, 2016

Er Rational musings #544

Er Rational musings #544



Party animal म्हणजे *"a very gregarious and outgoing person who enjoys parties and similar social activities."*



आणि आता Gregarious म्हणजे काय? तर, *"a person fond of company, sociable"*



मी तसा पार्टी अँनिमल ह्या वर्गातच मोडतो. सिंपल आहे; लहानपणापासूनच, (नववी दहावी पासून!!) मित्रांच्या घरच्यांना विचारायचो; बेधडक. काकू, तुम्ही गावाला कधी जाणार आहात? च्यायला..मग, कोणाचे घर रिकामे सापडले, की आम्ही धांगडधिंगा घालायला मोकळे. दारू, सिगारेटी, पानं न कसच काय काय नाय?!



पूढे दोन काँलेजेस, चार नोकऱ्या व नसते उद्योग, यामुळे मित्रपरिवार प्रचंड वाढला, विस्तारला, व्यापला अक्षरशः ना! नंतर नुसते पार्ट्यांचे घाट घोळ, ह्या ग्रूपच्या त्या मित्रात तंगड्या न फूल्ल टू क्राँस ब्रीड मिक्सींग. सगळ्यांना समान घट्ट दूवा एकच, पार्टी. यजमानपद!



ठरवण्याचा स्ट्रक्क्चर्ड वे होता व आहे. आँफीस पार्टी असली की, वा तसेही, प्रिंट आऊट वा एका कागदावर एका खाली एक मित्रांची नावे लिहून, पूढील काँलम्नस् करायचे आखायचे. व्हेज, नाँन व्हेज, हार्ड ड्रिंक (सब काँलम्नस् व्हिस्की, व्होडका, रन), किती पेग्ज, बियर, किती बाटल्या, साँफ्ट ड्रिंक्स. सगळ्यांकडन् फिडबँक आला, की ताळेबंद हिशोब, मार्जिन कूशन म्हणून (अनुभवाने समजलेली) जास्त क्वान्टिटी, कोण कुठली सिगारेट, पान मावा, नंतरच आईसक्रीम वगैरे वगैरे. चकणा, कोल्ड ड्रिंक्स, चवीनुसार गरजेनुसार. पार्टी मध्ये व संपली की लागणार लिंबू पाणी सोडा बर्फ इ साहित्य. ग्लासेस, डिशेस, पेपर डिशेस, पेपर नँपकीन, टूथ पिक्स, माचीस, अँश ट्रे, हाडं कचरा थोटकं जर्द्याची वेष्टनं काहीबाही टाकायला प्लँस्टिकच्या पिशव्या इत्यादि संड्री व्यवस्था. कोण झोपणार रहाणार जाणार (जाणार तर कसा?), वगैरे वगैरे वगैरे, किंवा कसे, ते हवं नको बघायचे. काँट्रिब्यूशन का कोणी *"स्टार"*वाला आहे का, त्याप्रमाणे, त्यानूसार वाटणी बिटणी. *स्टार वाला* म्हणजे, कधी कोणी असतो, काही कारणास्तव ठरावीक जास्त अमाऊंट देणारा, एखाद्या गोष्टीचा कंप्लीट खर्च उचलणारा..



चीअर्स!! चला, बसूया!!



शेवटी, पार्टी म्हणजे तरी नेमकं काय ओ.



*"A social gathering, joy n amusement, by the people, for the people, of the people."*



डेमाँक्रसी आँफ a साँर्ट...

---

Milinnd Kale, 3rd June 2016

No comments:

Post a Comment