Er Rational musings #559
'दी' व 'सिस' आणि 'ब्रो', यांची सध्या चलती आहे. अथांग पसरलेल्या आभासीमालांतील तारका व तारे च जणू.
एकमेकांशी 'प्रोफो' (प्रोफाईल फोटो) ओळख असल्याने, मराठीत 'दी' जोडणं अपरिहार्य झालय. काँमेंट टाकताना; दी फाँर दीदी; उदाहरणार्थ, हेमादी, रेखादी, जयादी लिहीणं केव्हाही सेफेस्ट.
इंग्रजी काँमेंट्स मध्ये तीच गत 'सिस' (सिस्टर) व 'ब्रो' (ब्रदर) ची.
ताई, आहे काही अंशी. पण दादा, भाई, भैय्या, गायब झालेत, फाँर आँब्व्हीयस रिझन्स!
'बडी', आहे काही अंशी. पण 'पाल' गायब झालाय. 'मेट' व 'काँम्रेड' सुध्दा गायब झालेत, फाँर आँब्व्हीयस रिझन्स!
पण हे इनएव्हिटेबल आहे. आणि इम्मटेरियल सुध्दा!
स्वामी विवेकानंदांचे एक सुरेख वाक्य आहे:
"We are what our thoughts have made us; so take care about what you think. Words are secondary. Thoughts live; they travel far."
सप्टेंबर अकरा, 1893 रोजी, स्वामीजींनी शिकागो येथे भाषणाला सुरूवातच अशी केली होती
"सिस्टर्स अँड ब्रदर्स आँफ अमेरिका"...
'सिस' n 'ब्रो'ज आर यू पेईंग अटेंशन...
---
Milinnd Kale, 9th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment