Er Rational musings #580
लेफ्ट हँड ड्राईव्ह करायला लागतं, मुंबई च्या बाहेर पडलं की. तुम्ही म्हणाल हे कसं काय? काय अमेरिकेत गेलावता का काय?
अहो नाही ओ. त्याच कायएना, मुंबई बाहेर पडलं की झाडून सगळेजणं उजवी लेन जी पकडतात की बास्सा. मग त्यात हेवी वेहिकल्स चा पहिला नंबर. तसेच काही निर्बुध्द कारचालक. साठ पासठ च्या स्टेडी (!) वेगात, कसले जात असतात, दूनिया गेली तेल लावत म्हणत.
दोन लेन च्या रस्त्यावर अवजड वाहनं उजवीकडच्या लेनने जातात, ह्याच्या पाठी लाँजिक आहे. दोन लेन रस्ता, हे प्लँनिंगच चूकीचे आहे. डावीकडे दूचाक्यांचा फ्लो असतो, रँडमली कंटिन्यूअसली आपल्याच धुंदकीत. ते कधी मधे वा उजवीकडे 'स्ट्रे' होतात ते त्यांच त्यांनाच सुधरत नसतय; मग कर्णकर्कश्श हाँर्न वाजला की ते लोक उपकार केल्यासारखे डावे होतात, म्हणजे साईड देतात. ट्रक्स ना वगैरे झक्कत उजवीकडून व्हावं लागतं, त्या बापूड्यांची काय चूक?
अडीच लेन चे रस्ते हवेत; (तसंही हल्ली दीड, अडीच चे फँड आहेच - टू अँड हाफ बेडरूम किचन, किंवा वन अँड हाफ बेडरूम किचन इ. हे हाफ म्हणजे एक गौडबंगालच आहे. "हाफ" साईज म्हणजे पूर्वीचे देवघर वा बाल्कनी च्या आकारमानाचं असतेना? नो उल्लू बनावींग, असो)
आता एव्हढं सगळ रामायण असल्यामुळे लेफ्टने (च) ओव्हरटेक करण, क्रमपात्र, अनिवार्य! कोण ढिम्म हलणाराय का? लेन्स दोन असो वा अडीच वा तीन, लेफ्ट साईड नेच ओव्हरटेक कराव लागणार; अक्कलशून्य आळशी व माजोर्डे मूर्ख माठ ड्रायव्हींग करणारे असेपर्यंत तरी. मुंबई पूणे द्रूकगती मार्ग हे तर केव्हढं मोठ्ठ ढळढळीत उदाहरण आहे डोळ्यांसमोर.
म्हणून म्हणलं, लेफ्ट हँड ड्राईव्ह...
---
Milinnd Kale, 20th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment