Thursday, June 16, 2016

Er Rational musings #573

Er Rational musings #573



दूखावलेला दूरावलेला मित्र असो, वा असफल प्रेम प्रकरण असो, वा नोकरी व्यवसायात वितुष्ट निर्माण झालेली xyz व्यक्ती असो, सगळ्यांच्या आठवणी येतातच. अनकंन्ट्रोलेबल समुद्र लाटा जशा असतात, तसेच. कारणमीमांसा निरर्थक असते अशावेळी, कारण घडलेलं धडून गेलेलं अस्त! "जर तर" चा आता काय उपयोग?! परंतू आपली अनुभवसंपंन्नता वाढत जाते.



त्या त्या वेळची परिस्थिति ही त्या त्या वेळच्या वस्तुस्थितिला धरूनच होती, हे आपल्याला सद्यस्थितीतच उमजतं. असं वागायला नको होतं किंवा तसं व्हायला नको होतं किंवा असं झालं असत तर; या सर्वांकडे त्रयस्थ पणे जेव्हा आपण "बघतो" तेव्हा कळतं की नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के आपण, आपलं वागणं, आपलं बोलणंच तेव्हा जबाबदार होतं.



आणि मला वाटतं, की, हे पक्क ध्यानात येणं, समजणंच, स्वत:साठी आजच्या घडीला योग्य आहे. गेलेला काळ परत येत नाही म्हणतात. सुटलेला बाण धनुष्यात परत थोडीच येतो? झालं गेलं गंगेला मिळालं. पुनरावृत्ती टाळणे हेच अपेक्षित आहे, हो ना? डेस्टिनी!! आणि जे घडतं ते विधिलिखीत असत. (त्या काळी पण हेच घडलं होतं - आठवतय का?)



थर्ड डिग्री "रेकी" (रेकी मास्टर) मध्ये नेमकं हेच बिंबवलं जातं. आय थँन्क मायसेल्फ फाँर बिईंग हियर; आय थँन्क रेकी फाँर बिईंग हियर; आय थँन्क डाँक्टर मिकाओ ऊसूई फाँर बिईंग हियर.



अँटिट्यूड फाँर ग्रँटिट्यूड...

---

Milinnd Kale, 17th June 2016

No comments:

Post a Comment