Er Rational musings #589
One of the best, enjoyy.
अप्रतिम काँन्टेपोररी साज बाज आवाज.
गीत - सौमित्र
संगीत - मिलिंद इंगळे
गायक - मिलिंद इंगळे
अल्बम - गारवा
पाऊस दाटलेला....
पाऊस दाटलेला,
माझ्या घरावरी हा
दारास भास आता,
हळूवार पावलांचा
गवतास थेंब सारे
बिलगून बैसलेले
निथळून साचलेले,
तळवा भिजेल आता,
हळूवार पावलांचा
झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
जेव्हा भिजून गेले,
पंखात नाद त्यांच्या
हळूवार पावलांचा
पाऊल वाट सारी,
रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली,
ओला ठसा कुणाच्या
हळूवार पावलांचा
पाऊस दाटलेला, माझ्या मनावरी हा...
पावसाने सगळ्यांच कवींना भूरळ घातलीये, कोणीच याच्या तडाख्यातून कोरडा राहिलेला नाहीये. मिश्र संमीश्र भावनाविष्कार, प्रीत, हुरहुर, आतुरता, उत्सूकता, विरह, जल्लोष, उत्साह, आनंद, दु:ख, आठवणी, बालगीते बडबडगीते ते नाट्यपदे, ते भावगीतं, ते लोकगीतं कोळीगीतं, ते चित्रपट गीते, अहो अहो कित्ती नानाविध रूपे.
~ भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
~ श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ।।
~ ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना ।।
फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू ।
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना ।।
~ श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।
~ घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.।।
~ वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।
भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,
सजनानं होडीला पान्यात लोटलंय् ।।
वादलवारं सुटलं गो !
~ नभ मेघांनीं आक्रमिलें ।
तारांगण सर्वहि झांकुनि गेले ॥
~ ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ।
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ।।
~ आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा ।।
~ केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर ।।
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर ।।
~ ए आई मला पावसात जाउ दे ।
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ।।
~ सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?
~ ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ।
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा ।।
~ नाच रे मोरा, अंब्याच्या बनात,
नाच रे मोरा नाच ।।
ढगांशि वारा झुंजला रे,
काळा काळा कापूस पिंजला रे,
आता तुझी पाळी, वीज देते टाळी,
फुलव पिसारा नाच ।।
~ झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात।
प्रियाविण उदास वाटे रात ।।
पाऊस म्हणजे निसर्गच ना? झाडून सगळे कवी महाकवी या पावसात चिंब चिंब भिजलेत, भिजताहेत, व आपल्या सारख्या रसिकांना नखशिखांत निथळवताहेत.
~ एक सर आली, मन मोहरून गेली
दोन सरी आल्या, मन गोंजारून गेल्या
तीन सरी आल्या, मन भिजवून गेल्या
चार सरी आल्या, मन थिजवून गेल्या
सरींचा सडाच अंगणात पडला
आणिक
मनाचा बांधाराच वाहून गेला...
https://youtu.be/fZ5Z1pn3HTs
हाऊ नोस्टँल्जिकली रोमँन्टिक...
---
Milinnd Kale, 24th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment