Er Rational musings #575
म्हणतात ना, लूक्स आर इंम्पाँर्टंट!
लूक्स बदलायला रूढार्थाने चाळीशी दरम्यान चाळीशीने सुरूवात होते. चष्मा "लागतो". केस आँलरेडी विरळ व्हायला लागलेले असतात, ते झपाट्याने कमी कमी होत होत, छानसं टक्कल पडायला लागत. (समोरचे पुढचे वरचे केस जाऊन पुढनं टक्कल पडायला लागल (मोठ्ठ कपाळ), की समजावं, मेंदूचा भयंकर वापर होतोय!, व पाठचे टाळू वरचे केस जाऊन पाठनं टक्कल पडायला लागल (गोल चंद्र), की समजावं, खिशात भयंकर पैसा खुळखुळायला लागलाय!! - जस्ट जोकींग हं). पोटाची घेरी बऱ्यापैकी वाढलेली असते. स्थूल पणा ठीकाय, ओ, साला, खाते पीते घरके हैं, क्या प्राँब्लेम हैं भाई? तसाही जरा भारदस्तपणा पण येतो, स्थैर्याचं लक्षण पण आहे ना, "जडत्व!"
परंतु मेन लफडं म्हणजे, केस, मिशी दाढी पांढरी व्हायला लागते, यार!!
इथे मात्र आभाळ कोसळल्यासारखा आघात होतो. पांढरे केस! बाकी सहनेबल असतं, पण धीस इज टू मच. एक काम पण वाढतं, ते म्हणजे महिन्या महिन्याला कलप वा केश काला वा मेंदी लावण्याचा घाट.
मागच्या आठवड्यात असच झालं. काही ना काही कारणाने, 'राह्यलेले' केस काळे करायचे 'राहून' गेले. सटासट दाढीची खुंटं वाढली, दाढी तुळतुळीत करायची तशीही राहूनच गेली होती. (एकंदरितच दररोज दाढी करण्यासारखं बेचव निरस काम नसेल; माझं अत्यंत नावडत काम). च्यायला, बिल्डींग मधल्या एक तिघांनी कसला लूक दिला माझ्या या लूक ला!
काही जणांची स्कीन अशी असते, त्यांना दाढी मिशी येत नाही, वा उगाचच थोड्डीशी येते. अशा व्यक्तींचा मला प्रचंड हेवा वाटत आलाय. कित्ती छान ना? नाहीतर आम्ही; एखाद्दिवस जरी गँप पडली तरी "पांढरकेशेपणा!!"
एक माणूसच ठेवला पाहीजे कताईला...
---
Milinnd Kale, 17th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment