Er Rational musings #572
रात्री उशीरा घरी परतताना मुलुंडला भूर्जी पाव खायची जूनीच सवय आहे. लज्जतदार. काय बरं वाटतं! पण हल्ली भूर्जी च्या गाड्यांना पार साईडलाईन केलय बाकीच्या गाडीवाल्यांनी. मुलुंड पश्चिम म्हणजे गुजराती जरा जास्त संख्येने. पहिल्या पासूनच; मुलुंड पश्चिम गुज्जू भाय आणि पूर्वेला मी मराठी माय मराठी चे साम्राज्य. त्यानुसार जरा व्हेज, जैन वगैरेच जरा जास्तच स्तोम माजवलय पश्चिमेला.
तर झालय असं की पूर्वी देना बँन्केजवळ एक, शिवसेना शाखेच्या बाहेर एक, काँग्रेस च्या आँफीस समोर, स्टेशनच्या (ठाणा साईड) समोर, (इंसिडंटली इथेच बाजूच्याच गाडीवर अत्युत्कृष्ट चवीष्ट घरगुती मटण, खिमा, चिकन, बिर्याणी वगैरे मिळते), पोस्ट आँफीस बाहेर, तांबे नगरला, आयसीआयसीआय बँन्केच्या थोडस् पुढे वगैरे ठिकाणी भूर्जी च्या गाड्या लागायच्या. तीनेक उरल्यात. पाव भाजी, दाबेली, वडा पाव, पाणी पूरी, डोसा उत्तपा, चायनीज भेळ, कुल्फी, अशांच्या मांदीयाळीत माझी लाडकी भूर्जी मानाच स्थान टिकवून आहे, संघर्ष करत करत!!
हल्ली काये, की, सगळ्याच खाऊ गल्ल्या झाल्यात. प्रचंड व्हरायटी. त्यामुळे कुठली व्हेकंट जागा दिसली का गाडी लागली. असो.
मुलुंडला रस्त्यावर अस्सल भूर्जी आँमलेट पाव खात आलोय, लहानपणापासूनच! डब्बल भूर्जी, डब्बल आँमलेट वा कधी हाफ फ्राय पलटी मारून व कधी बरोबरीने बाँईल्ड, प्लस चार पाव, बारीक चिरलेला कांदा, संपल! ह्या गाड्यांवर भूर्जी, आँमलेट, हाफ फ्राय बनवताना व बाँईल्ड सोलताना बघण्यात पण एक वेगळीच गंमत आहे, इतकं त्यांच सगळ पध्दतशीर चाललेलं असत. करणारा एक जण, व एक हेल्पर, खरंखुरं मल्टी टास्कींग; एकाचवेळी या खाण्याच्या तीन चार गोष्टी बनवणं, बश्या लावणं, पार्सल देणं, कांदा मिरची चिरणं, प्लेटा उचलणं, गाडी साफ करणं, पैसे घेणं देणं, टोपात पाणी देणं, बापरे.
आजची तर झाली, एकदा याच मजसोबत भूर्जी पाव खायला...
---
Milinnd Kale, 16th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment