Thursday, June 9, 2016

Er Rational musings #560

Er Rational musings #560



हल्ली बरेचदा मला दोन टकल्यांची आठवण होते. एकाने जागतिक पातळीवर सर्वांचे जगणे सुसह्य केले, तर दूसऱ्यामुळे भारतात नव-वारे पंचवार्षिक वाहू लागले. दोघांच्या अमूल्य योगदानामुळे परिस्थिति आमूलाग्र बदलली, कायमची, हेच खरे.



टकली माणसं, मोठी म्हातारी असताना जरी बघीतली, तरी, काही टकले हे बाँर्न टकले च असावेत, असे वाटते! विन्स्टन चर्चिल घ्या, किंवा आँल्फ्रेड हिचकाँक घ्या किंवा चित्रपटांतील फायटर शेट्टी (सिनियर) घ्या किंवा ली आयकोका घ्या किंवा अगदी अनुपम खेर घ्या, ह्यांना कधीकाळी डोक्यावर केस असावेत, अस वाटतच नाही!!



मी ज्यांचा उल्लेख करतोय ते आहेत नव्वदीच्या दशकातले.



एक टकला म्हणजे पूर्वीच्या अखंड अभंग रशियाचा (युनायटेड स्टेटस् आँफ सोव्हीएत रशिया - USSR) चा तात्कालिन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह. यांच्या टाळूवरच रशियाचा नकाशा वाटेल असा पर्मनंट जन्मखूण होती. नियतीने लिहूनच ठेवले होते जणू. केजीबी, रेड आर्मी, क्रेमलीन असले धडकी भरवणारे शब्द तेव्हा प्रचलित होते. कोल्ड वाँर, डबल एजंट, टर्न कोट, सीआयए केजीबी, कोव्हर्ट आँपरेशन्स वगैरे थरार जेम्स बाँड व इतर अनेक हाँलीवूड चित्रपटांतून आपण बघीतलेत. याला कायमचा छेद दिला, पूर्णविरामच जणू, तो या महाशयांनी! ग्लासनाँस्ट (ओपननेस - खूलेपणा) व पेरेस्ट्राँयका (रिस्ट्रक्चरिंग - फेरबदल) यांचे जनक, म्हणून मिखाईल गोर्बाचेव्ह हे ओळखले जातात. महाकाय प्रचंड व गूढ अशा यूएसएसआर चे विघटन व विकेंद्रीकरण विविध देशांमध्ये झाले, व संपूर्ण जागतिक शांततेसाठी अनन्यसाधारण अशी पावले पडली!



स्वातंत्र्यानंतर तब्बल एकोणचाळीस त्रेचाळीस वर्षे, भारतातील सार्वत्रिक निवडणूका म्हणजे मनी मसल पाँवर म्हणून काहीश्या हिणवल्या जायच्या. आओ जाओ घर तुम्हारा. आयाराम गयाराम संस्कृती. हम करेसो कायदा. व सबकूछ चलता हैं. ह्या समजांना सुरूंग लावायची सुरवात भारताचे तत्कालीन मूख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेेषन यांनी केली. प्रभावीपणे, खंबीररित्या, कणखर पोलादी निश्चयाने, निवडणूक सुधारणा आणण्याचे श्रेय शेषन यांचेच. हे ते दूसरे टकलू गृहस्थ!



या दोन टकलूंमुळेच भारतात व जागतिक पातळीवर 'Modi'fication व्हायला लागलेय की काय?



मिखाईल गोर्बाचेव्ह, टी. एन. शेेषन, जय हो...

---

Milinnd Kale, 10th June 2016

No comments:

Post a Comment