Saturday, June 18, 2016

Er Rational musings #578

Er Rational musings #578



टेबल मँनर्स, एटिकेटस् व कन्व्हेंन्शन्स



~ हाँटेल मध्ये गेल्यावर वेटर ला बोलवायची, हाक मारायची पध्दत आहे. एक्स्क्यूज मी, अस म्हणत बोलवायचं असतं.



मी आपला ओठांनी तोंडाचा चंबू करून पूच पूच आवाज काढून वा स्पस स्प, असले काहीतरी आवाज काढतच बोलावतो राव, ऐकू तर गेलं पाहीजे.



~ कोल्ड ड्रिंक ची बाँटल घेतली तर ती सगळी संपवायची नाही; तर थोडस् पेय बाटलीतच (तळाला, साधारणपणे दोन बोटं) ठेवायचं.



म्या बापूडा येक तर असलं कायबी पीत न्हाई. पन् कोनी सूर्र सूूर्र करूनशान समदं संपीवल की बरं वाटतया.



~ डाल राईस वा बिर्याणी खाताना मस्तपैकी दोन्ही हातात चमचे वा एका हातात काटा दूसऱ्या हातात चमचा घ्यायचा व खायचे.



छ्या बाँ. डाळभात छानपैकी कालवून बिलवून आडवा हात मारावा चांगला. आणि बिर्याणी म्हणाल तर ती काय काट्या चमच्याने खायची चीज आहे का? छानसं हातानी खावं, हाडं तोडावीत, मांस चाटून पुसून फस्त करावं.



~ चहा काँफी काही मागवली असली की ती आणताना थोड्डीशी का होईना, बशीत सांडलेली असते. मग कपातला चहा काँफी प्यायची फक्त.



नाही बाबा. थोडासा चहा वा काँफी त्याच बशीत ओतून पहिले फूर्र फूर करत पिवून संपवायच बघा.



~ खाऊन झालं की प्लेट थोडी पूढे सरकवावी व दोन्ही चमचे क्राँस करून त्यात उपडे ठेवावे.



ह्यो चलतय.



सौजन्याची ऐशी तैशी...

---

Milinnd Kale, 18th June 2016

No comments:

Post a Comment