Friday, June 10, 2016

Er Rational musings #562

Er Rational musings #562



काही सर्वदूर सर्वपरिचीत पूणेरी हाँटेली पाट्या

~ जास्त वेळ बसू नये.

~ आचकट विचकट आवाज काढत चूळा भरू नयेत.

~ केस विंचरू नये.

~ कूपन घ्यायच्या आधी, आवडीच्या भाज्या आहेत का, याची चौकशी करावी; मागाहून कोणतीही तक्रार चालणार नाही, व पैसेही परत मिळणार नाहीत.



नाहीतर, आहेच, सभ्य भाषेत, किचन एरिया च्या बाहेर

~ नो अँडमिशन



उलटपक्षी पूढील पाट्या बघा:

~ ओनर आँफ धीस रेस्टाँरंट् अल्सो ईटस् हियर.

~ आफ्टर लंच रेस्ट अ व्हाईल, आफ्टर डिनर वाँक अ माईल.



वा



~ एनी बडी व्हू वाँटस् टू सी अवर किचन, कँन डू सो.

ही पाटी असो.



"उडिपी ए रमा नायक (since 1942)"



माटुंगा रेल्वे स्टेशन समोरील पहिल्या मजल्यावरचे लंच होम. आज येथे भोजन करून हा ब्राह्मण तृप्तीची ढेकर देवून बाहेर पडला. परत यायचं मनाशीच नक्की करून!



माझा एक आवडता जाँईंट, रसास्वाद 1987 पासून...

---

Milinnd Kale, 10th June 2016

No comments:

Post a Comment