Thursday, June 9, 2016

Er Rational musings #557

Er Rational musings #557



किती निगेटिव्हिटी पसरवतो ना आपण? कसलीबी खतरजमा न करता, कसल्यान् पोस्टी फाँरवर्ड करत सुटतो. अशाने आपण आपल्याच व्यवस्थेची, आपल्याच लोकांची सरकारची प्रतिमा डागाळतो, मलीन करतो. पर्यायाने आपलीच! अजाणतेपणे. हेतू वाईट नसेलही, उलटपक्षी या त्रुटी, चुका निदर्शनास आणल्याच गेल्या पाहीजेत. परंतू चक्रवाढ दराचं हे आभासी मायाजाळ पराचा कावळा व राजाला रंक करून सोडू शकतं, इतकं सामर्थ्य याच्यात आहे, याचं भान ठेवले पाहीजे, इतकेच.



बी पाँझिटीव्ह, वाँक पाँझिटीव्ह, टाँक पाँझिटीव्ह, पोस्ट पाँझिटीव्ह, सेंड पाँझिटीव्ह.



हे कमी म्हणून की काय, कुठल्यासुटल्या (सो काँल्ड) शिष्यवृत्या, नोकऱ्या, रक्ताची / पैशाची गरज, हे प्रकार आहेतच. कृपया, अशा पोस्टस् पूढे पाठवण्या आधी, स्वत: त्यातल्या वेब लिंकस्, फोन नंबर्स इत्यादि किमान एकदा तरी अँक्सेस करून बघाव्यात, ही नम्र विनंती.



इथे टच करा, चमत्कार बघा बिघा, हे तर टोकच. अहो सिंपल साँफ्टवेअर असत हो, कोणीही बरा प्रोग्रँमर हे असले उद्योग करू शकतो, सहजतेने! बरं, त्या चमत्काराचा आपल्याला काय अर्थाअर्थी फायदा? अजब आहे.



दिलासा देणारी, सुखावह बाब म्हणजे, सात जणांना वा ग्रूप्स ना फाँरवर्ड करा - अमूकतमूक प्रसन्न, या टाईपच्या पोस्टस् नामशेष झाल्यातच. जनजागृती!



प्लीज टेक धीस पाँझिटीव्हली...

---

Milinnd Kale, 9th June 2016

No comments:

Post a Comment