Wednesday, June 15, 2016

Er Rational musings #571

Er Rational musings #571



मस्त पैकी हिरवळ, लाँन वर गार्डन चेअर्स व टेबल. वाँर्डरोब घातलेला, पायांत सपाता, वा सकाळी सकाळी काहीतरी बैडमिंटन वगैरे खेळून आलेला, पायांत पांढरेशुभ्र स्पोर्ट्स शूज, वा नुसताच सकाळच्या वर्तमानपत्रांत डोकं खुपसलेला कर्ता पुरूष. घरातून अर्धांगिनी वा कोणी नोकर हातात ट्रे घेऊन बाहेर येतात. अलगद तो ट्रे टेबलावर ठेवतात. चहाची किटली, त्या किटलीवर चहा गरम रहाण्यासाठी टोपडं घातलेलं, दोन रिकामे कप चमचे आतमध्येच, साखरेचे क्यूब्ज, दूध वेगळे...

व्वाँव क्या सेटिंग हैं!!



बऱ्यापैकी हाँटेल. खांद्यावर फडके, कानात खूपसलेलं पेन, हातात ट्रे व छोट्टूसं बिल बूक एकाचवेळी एकाच हातात घेतलेला वेटर. चहाचा टिप्पीकल तपकिरी पिवळसर रंगाचा मोठा गोल कप व खोलगट नसलेली चपटी त्याच रंगसंगती ची बशी. चहा थोड्डासा गारचट पानचट पातळ.

व्वाँव क्या चीज हैं!



"शंविहिंहाँ"; म्हणजे आपलं, गूड ओल्ड, फ्रेंडली नेबरहूड, "शंकर विलास हिंदू हाँटेल". एकाच कानात बेचकी घातलेली, तशीच एका दंडाला बेचकी वा ताईत बांधलेला. कळकट मळकट रंगाचा गंजीफ्राँक. कंटिन्यूअसली समोरच्या शेगडी वर ठेवलेल्या पितळी भांड्यात, एका मोठ्या पळीच्या डिझाईनच्या चमच्याने साखर, चहा, दूध, पाणी घालत च रहाणे. आवाज करत ढवळत राहणे. उकळी येतच असते त्या मिश्रणाला, ती शमवतच रहाणे, ही येथील खूबी खासीयत. गाळणं, म्हणजे एक फडकं. चहा दोन भांड्यातनं (एका छोट्या भांड्यात चहा वर तो उपडा करून वर दूसरी मोठी वाटी) वा छोट्या ट्रेडमार्क ग्लासेस मधनं वा पार्सल म्हणलं तर प्लँस्टिकच्या पिशवीतनं अलाँगविथ चिमूकले सफेद रंगाचे प्लँस्टिक कप्सने सर्व्ह करत रहाणे, दिवसभर अक्षरशः

व्वाँव क्या बात हैं.



सार्वजनिक मूतारी, सुलभ शौचालय, कचराकुंडी वगैरे चा परिसर. रस्त्यांआडचा खोपच्यातला एक कोपरा. एक मेकशिफ्ट ओटा कम डायनिंग टेबल कम सर्न्हिंग एरिया. स्टोव्ह विझू नये, वारा लागू नये म्हणून कव्हर म्हणून लावलेला एल वा सी शेप्ड पत्रा. चहाचे ग्लासेस विसळायला धूवायला, खाली गटाराशी लावून ठेवलेले दोन पाण्याने भरलेले टोप. चार पाच ग्लास चार पाच बोटांत पंजात पकडून एका टोपात बुचकळायचे, नंतर तेच दूसऱ्या टोपात, जरा कमी गढूळ पाण्यात विसळल्यासारखे करायचे. कुठलं दूध व कुठलं पाणी?! गरम गँस, उकळत पाणी.

व्वाँव क्या चाय हैं।



टेक यूवर पिक. चाँईस इज यूवर्स.



परंतु चहा केवळ निव्वळ अमृततुल्य!



सर्वांना "सू(टी)प्रभात"...

---

Milinnd Kale, 16th June 2016

No comments:

Post a Comment