Er Rational musings #563
आला, आला, येणार येणार म्हणता म्हणता पहिला पाऊस आला. मुलुंडात मोठ्ठ्या सरी येवूनगेल्या.
आता लवकरच..
मुसळधार संततधार पाऊस..
लोकल गाड्या वीस पंचवीस मिन्टं लेट..
रेल्वे रूळांवर पाणी..
रस्त्यांवर खड्डे, खड्यात पाणी, पाण्यात रस्ते..
संथ मंद वाहतूक, रहदारी, ट्रँफीक जँम, स्नार्ल..
दरडी कोसळण्याचा धोका, धोकादायक जून्या इमारतींना धोका..
खवळलेला समुद्र, समुद्राला उधाण..
साथींचे आजार बळावले..
काही भागात वीज गायब, वीज पुरवठा खंडीत..
काही कार्यालये लवकर बंद केली..
रिक्शा, ट्रेन, टँक्सी, हाँटेल वगैरे कुठेतरी छत्री विसरली..
रस्त्यावरील टपरीतली गर्रमा गर्रम कांदा भजी, बटाटे वडे, चहा..
पावसाळी सहल, ट्रेक, आऊटींग..
गरम वाफाळलेला काँफी मग..
नुसतचं बिछान्यावर लोळणं..
शाळा काँलेजला दांडी, आँफीसला बुट्टी..
मरीन ड्राईव्ह क्वीन्स नेकलेस, हाजी अली, वरळी सी फेसवर आदळणाऱ्या लाटांत रेन डान्स..
इत्यादि वगैरे सर्व, व आणखीनही बरेच काही..
हे सग्गळ आहे अनुभवायला, माझ्या मुंबईत..
# स्वागतोत्सूकमिलिंन्दमोरेश्वरकाळे
---
Milinnd Kale, 11th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment