Thursday, June 23, 2016

Er Rational musings #585

Er Rational musings #585



'आर अँन्ड डी', म्हणजे खरेतर 'रिसर्च आणि डेव्हलपमेंट'. इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च आँर्गनायझेशन) पेक्षा दूसरे कुठले सार्थ समर्पक उदाहरण असेल? शक्यच नाही.



1969 साली स्थापना झालेल्या इस्रो ने पहिल्या सहा वर्षांतच आर्यभट्ट नावे प्रथमच संपूर्ण भारतीय बनावटीचा उपग्रह बनवला. तत्कालीन सोव्हीएत युनियनने तो प्रक्षेपित पण केला 1975 साली. मग मात्र इस्रो ने मागे वळून बघीतलेच नाही.



रोहिणी, अनेक उपग्रह, जीएसएलव्ही, क्रायोजनिक इंजिन, पीएसएलव्ही, ते चांद्रयान ते मंगळ स्वारी ते कालचे एकाचवेळेस यशस्वी रित्या सोडलेले 20(!) उपग्रह!! आता आरयूएलव्ही - रि यूजेबल लाँन्च वेहिकल ते यूएलव्ही - यूनिफाईड लाँन्च वेहिकल ते चांद्रयान 2, ते शनी स्वारी ते..ते..आँप्शन्स अनलिमिटेड..स्काय इज (नाँट) द लिमिट!! फाँर इस्रो; सलाम. हँटस् आँफ.



हार्दिक अभिनंदन व मन:पूर्वक शुभेच्छा.



इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च आँर्गनायझेशन) व डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट आँर्गनायझेशन) सारख्या, चक्क सरकारी पण स्वायत्त संस्था, अविरत प्रयत्नांतून रिसर्च मधून, एकापेक्षा एक सरस उंच धडाडीची पावलं टाकताहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान डेव्हलप करताहेत.



बाकी बरेच ठणठणगोपाळ; सगळे नाहीत हं, पण. असं खेदाने नमूद करावसं वाटतय.



या अशा बऱ्याचशा अवांतर सवांतर 'आर अँन्ड डी' संस्था म्हणजे 'रिसर्च आणि डेव्हलपमेंट', का काय, च्या नावानं शून्य.



बहुतांश "रिलँक्स अँन्ड डुप्लीकेट"...

---

Milinnd Kale, 23rd June 2016

No comments:

Post a Comment