Er Rational musings #581
थोडं(सच) जास्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे आपापल्या मुलांना.
हल्लीहल्लीचे नवदांपत्य, नवविवाहित एकदा का बाप व आई बनले की त्यांच्या आनंदाला पारावार रहात नाही. मुलाचे कोडकौतुक व काय करू व काय नको, अशी संक्रमणावस्था मोठी मजेशीर असते.
बरेचदा असं असतं की या नव-पालकांना शाळेत, काँलेजमध्ये वगैरे ते असताना, कुठल्याश्या गोष्टीत, एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटी मध्ये रस असतो, आवड असते. काहीनाकाही कारणांमुळे त्या त्या विषयात, मग ते संगीत असो वा गायन, स्विमिंग असो वा एखादा बैठा वा मैदानी खेळ, नाटकांत काम करणं असो वा ट्रेकींग, त्यांना हवी ती उंची गाठता आलेली नसते - कारणं काहीही असू शकतात. मग, त्यांना वाटतं, आपल्याला नाही जमलं, पण आपल्या मुलाने मात्र ते साध्य करायला हवे. धीस इज बट नँचरल, अंडरस्टँन्डेबल.
ती मुलंही त्यात रस घेतात, जीव तोडून मेहनत करतात, एक ठरावीक उंची देखील गाठतात. निरनिराळ्या स्पर्धांत भाग घेतात, अँड दे एक्सेल देअर, नो डाऊट. एखाद्या खेळात प्राविण्य मिळवणं ही सोपी गोष्ट नव्हे. त्यापाठी आपल्या मुलांचे प्रचंड कष्ट, मेहनत तर असतेच, परंतु पालकांचेही योगदान दुर्लक्षीत करता येण्यासारखं नसतं!
या कला वा क्रिडे मधील सातत्य, कामगिरी व पायरी बघून, ह्या मुलांना कोणी कंपनी शिष्यवृत्ती बरोबर आपल्या सेवेतही रुजू करून घेते. आणि हाच क्षण महत्वाचा असतो, मुल व आई बाप, दोघांसाठी.
बऱ्याच उदाहरणांत असं आढळतं की, इथूनच दोघांचा फोकस कमी व्हयला सुरूवात होते. चला, नोकरी तर मिळाली, ही सूरक्षेची भावना वरचढ व्हायला लागते. मग सुरू होतं पाट्या टाकणं; त्यामुळे स्पोर्ट्स लीव्ह वा इतर कन्सेशन चं महत्व कमी होण्याचा धोका असतो. कठोर परिश्रम, जिद्द, ईर्षा (चांगल्या अर्थाने - विल टू अचीव्ह/एक्सेल) व जोडीने मेहनत; तसेच फक्त फक्तच सराव सराव व सराव. त्याचबरोबर फोकस फोकस, फोकस; हेच खरतर क्रमपात्र आहे, अपेक्षित आहे, करायलाच पाहीजे.
ह्या टप्यावर, पालकांनी वेळीच, थोड(सच) पूश करायची गरज असते. थोडं. हा क्रूशल पिरियड आहे, हे ओळखलं पाहीजे. यातनं उत्तमोत्तम खेळाडू घडतील, राज्याच, भारताचं, प्रतिनिधित्व करायला सज्ज होतील ह्यात शंका नाही.
थोडी प्रसिद्धी सुध्दा (अजाणतेपणे) मुलांच्या डोक्यात जाण्याची शक्यता असते.
त्यांना थोड(सच) पूश करा अशावेळी, व सांगा
दि बँटल इज वन, बट दि वाँर इज नाँट ओव्हर...
---
Milinnd Kale, 21st June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment