Er Rational musings #556
आपण म्हणजे पब्लिक डोमेन मधले ओपन बूक झालोय.
तिरकी बिरकी मान, अचंबित झालेला चेहरा, ओठांचा चंबू, डोळे साईड वेज, गालावर टिचकी सदृश बोट, (व उभा फोटो असेल तर, कमरेवर विठोबा सारखा, पण अलगद, ठेवलेला हात), वगैरे वगैरे. ही आहेत तरूण मुलींच्या डीपी वा प्रोफाईल पिक्चरची वैशिष्ट्यं!!
गाँगल बिगल घालून, वा डोक्याला फेटा बांधून, टि शर्ट घालून, पण पूर्णपणे मुछमुंढा वा उगाचच खालच्या ओठाखाली खुंटं, एखाद्या मोटर बाईक संगे फोटू; ही आहेत तरूण मुलांच्या डीपी वा प्रोफाईल पिक्चरची वैशिष्ट्यं!!
मध्यमवयीन पुरूषाचा डिपी वा प्रोफाईल पिक्चर म्हणजे (स्वत:च्या) बायको संगे फोटो;
मध्यमवयीन महिलेचा डिपी वा प्रोफाईल पिक्चर म्हणजे सुंदरस निसर्गचित्र वा एखाद्या सुरेख फूला बिलाच चित्र. नाहीतर, मोस्टली एकटीचाच वा मुलांबरोबरीचा फोटो, पण सेल्डमच, नवऱ्याबरोबरचा;
डिपी वा प्रोफाईल पिक्चर, त्या त्या व्यक्तिची त्या त्या वेळची मानसिकता, कल, आवड, पसंती, दाखवतो. तसेच, एखादी व्यक्ति महिनोंमहिने डिपी वा प्रोफाईल पिक्चर सेमच ठेवत असेल, तर तो वा ती, सोशल नेटवर्किंग बद्दल तसे निरूत्साही असावेत, असंही समजायला वाव आहे. याउलट, या आभासी दुनियेतील जागरूक काँन्शस व्यक्ती, स्वत:चा डिपी वा प्रोफाईल पिक्चर, वारंवार बदलत राहतात!!
उघडं पानच ते पुस्तकाचे! कोणीही यावो, व विनासायास वाचून समजून उमजून जावं; ते ही आपल्या अपरोक्ष...
---
Milinnd Kale, 9th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment