Thursday, June 30, 2016

Er Rational musings #595

Er Rational musings #595



चल, तुला आता सलाईनची गरज आहे, आणि मला माझ्या टाँनिक ची! मी आमच्या अहोंना म्हणलं. आता एव्हढ्या चोवीस दोन वर्षांनंतर तिला सवय झालीये माझ्या 'असल्या' बोलण्याची, व मलाही माहीतीये तिचे 'तसले' बोलणे! फिट्टमफाट.



अहोंचे सलाईन म्हणजे भैय्याकडची पाणी पूरी व माझं टाँनिक म्हणजे रस्त्याकडल्या टपरी वरचा चहा. ह्या दोन्ही गोष्टींवर अहो व मी, अनुक्रमे, जगू शकू, आयुष्य काढू शकू. हे नक्की. पाणी पूरी हा वीक पाँईंट नसणाऱ्या बायका ह्या जवळपास शून्य नव्हे, तर, मायनस इन्फिनीटी, असतात, असा माझा कयास आहे.



खमंग, चवीष्ट, लज्जतदार, मधूर चव ही रस्त्यावर बनवल्या व विकल्या जाणाऱ्या खाद्य/पीत पदार्थांना असते. शरीर सुदृढ व मन ठाकठीक रहाण्यासाठी या बाहेरख्याली खाण्या पिण्याची गरज आहे. किंवा ग्रेड फोर हाँटेलची. कारण, जेव्हढं हाँटेल कळकट, मळकट, अंधारं, दिसायला फालतू, तेव्हढच इधल अन्नपाणी "चव रेझ टू अनंत", व पचायला हलकं, जीभेचे चोचले पुरवणारं, पोटभरणीच असतय.



कसलं (सडकं) दाणा व (दूषित) पाणी, दृष्टीआड सृष्टी...

---

Milinnd Kale, 30th June 2016

No comments:

Post a Comment