Er Rational musings #597
आजची सकाळ जराशी गडबडीची.
आज दांडीबुट्टी कामधंद्याला. रात्री मित्र घरी येणारे सहकुटुंब, पार्टीसाठी.
मुलुंड जिमखाना व टेबल टेनिस झाले नेहमीप्रमाणे पहाटसकाळी; घरी पोहोचल्यावर कामाची यादीच टेकवली हातात आमच्या अहोंन्नी.
~ आईची औषधे संपलीयेत, आणायचीयेत.
~ देवघरातली फूले, बेल, दूर्वा, तुळस आणायचय.
~ बँन्केच काम आहेच.
~ रात्रीसाठी चिकन आणायचय.
आणि हो, मला जरा दूकानात ड्राँप करून पूढे जा, कस्सला तूफ्फान पाऊस आहे ना.
मग आमची स्वारी सवारी निघाली. एकेक मोहीम फत्ते करत, करत. आमच्या अहो, म्हणजे मायाबाईंना दूकानाच्या बाहेर सोडलं. मग चिकनकाम. झोराबियनचे चिकन व शँलो फ्रायला लाँलिपाँप कबाब. बँन्क. फूले. औषधे. दरमजल करताना, थोरल्या चिरंजिवांची फर्माईश, बाबा, भगतची भजी व वडा पाव; मस्त पाऊस पडतोय, घरी गेल्यागेल्या खावूया. मगकाय, तेही काम झालं.
गाडी पार्क करून, एकेक पिशवी घेतली हातात. जिना चढताना मनात उगाचअसाच विचार चमकून गेला: फूले, चिकन, वडाभजी पाव व औषधे (!!) यांचा अर्थार्थी काही संबंध आहे का? कायकाय हातात आहे!
पण असलच वैविध्य रंगढंग असतय ना आपल्या जीवनरहाटीत??!
मल्टीटास्कींग; फिलींग हँप्पी...
---
Milinnd Kale, 1st July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment