Er Rational musings #561
~ सर, लँन्डमार्क क्या हैं?
त्या आयडिया वाल्या मँडमने विचारले, नवीन नंबरचा फाँर्म भरताना.
~ मी म्हणलं एमजीआर 32
~ ये क्या हैं? कोई हाँटेल हैं क्या? (अंधेरीच्या एनएच 2 च्या सारख?!)
ती बुचकळ्यात, कन्फ्यूज्ड!
मनात म्हटल, अजून कोड्यात टाकूया तिला.
~ म्हणलं, पोल नंबर!
ती ब्लँन्क!
~ म्हणलं, लाईट का खंबा.
प्रश्नार्थक नजर, परत. मनात ती म्हणाली असेल, क्या घनचक्कर कस्टमर हैं!
आता मात्र मला रहावेना, तिला म्हणलं,
~ लँन्डमार्क लिखो, पांच रस्ता. महात्मा गांधी रोड - एमजी रोड!!
हुश्श म्हणून उसासा सोडला बाईने.
मी, माझा नवीन आयडीया स्पेशल नंबर (xxxxx xxxxx) घेऊन बाहेर, ती आतच दूकानात, हे एमजीआर 32 काय प्रकरण आहे, तो विचार करत.
फँक्ट आँफ द मँटर इज, हा जो एमजीआर 32 पोल नंबर मी बोललोतो, तो करेक्ट लँन्डमार्क होता, आयुष्यभरात अगदीच अपवादात्मक बदलणारा.
इटस् व्हेरी सिंपल. तो होता एमएसईबी चा माझ्या घरासमोरचा स्ट्रीट लाइट पोल. एमजी रोड वरचा 32 नंबरचा पोल; हे असं स्टेन्सिलींग, नंबरींग केलेल असत. हे पथदिवे बदलतात, नाही असं नाही; मर्क्यूरी व्हेपर (सफेद पांढरे) जाऊन, सोडियम व्हेपर (पिवळे) आले; ते जाऊन मेटल हलाईड (सफेद पांढरे) आले, ते जाऊन एलईडी येऊ घातलेत; पण नंबर्स क्वचितच बदलतात.
पोल नंबर्स एका दिशेने वाढत जातात; एमजीआर 1 ते 78 वगैरेसे. मधल्या सब लेन च्या पोल्सवर नंबरींग असत, एमजीआर 32/1 ते एमजीआर 32/8 (समजा एमजीआर 32 ला लागूनच गल्ली आत जाते व आठ लाईट पोल्स असतील तर, उदाहरणार्थ!!)
पथदिव्यांच निरनिराळे वाँटेज असत, दोन पोल्स मधल अंतर ठरवण्याचे निरनिराळे फाँर्म्यूले वापरले जातात. टाईप आँफ रोड - मेन रस्ता, सब लेन, बाय लेन इ; रस्त्याची रूंदी, पोलची हाईट(!), बल्बच वाँटेज, प्रकाशाची लक्स लेव्हल वगैरे वगैरे. हा झाला टेक्नीकल भाग. पण आता क्लीअर झालं असेल, की, जर पोल्स ची संख्याच जरका वाढली कमी झाली म्हणजे बदलली तरच नंबरींग बदलतं, वा अगदीच रस्त्याचं नाव बिव बदलल तर! अन्यथा न्नाही! दादरच्या दादासाहेब फाळके रस्त्यावर पोल नंबर्स आहेत, डिएफआर 1 ते पूढे!!
हा लँन्डमार्क ग्राह्य धरायला हवा, पण यांना लागत एखाद हाँस्पीटल, बँन्क वगैरे, असो.
एखाद्या ओळखीच्याला पत्ता सांगताना जवळचा पोल नंबर नक्की द्या हं यापूढे!
आपापल्या घर - आँफीस जवळचा पोल नंबर आजच लक्षात ठेवणार तर...
---
Milinnd Kale, 10th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment