Er Rational musings #565
"रम, रमा, व रमी" चा 'अतिरेक' माणसाच्या आयुष्याची वाट लावतो.
थोडक्यात मजा, असं म्हणतात ते काही उगाच नाही. परिस्थिति हाताबाहेर कधीही जाऊ शकते. ह्यांची सुस्साट सैराट झिंगनशा काय रूप धारण करेल, सांगता येत नाही. असो.
स्टँच्यूटरी वाँर्निंगच काम पहिले केलं.
पण, माझं म्हणणं असे आहे, की, या तिन्ही गोष्टी योग्य प्रमाणात, योग्य त्या वेळी, व योग्य प्रकारे, केल्याच पाहीजेत. त्यात मास्टरी मिळवली पाहीजे.
इटस् नायदर रिडीक्यूलस, नाँर अँब्सर्ड आँर फनी!!
रम (मद्यपान), म्हणजे अर्थाअर्थी ड्रिंक्स, मादक नशीले पदार्थ नव्हेत. तर, रम सिम्बोलायझेस सोशलायझेशन. गो गेटींग-नेस! मिक्सींग विथ पीपल.
रमा (बहिर्गमन!), म्हणजे अर्थाअर्थी बाहेरख्यालीपणा नव्हे. तर रमा सिम्बोलायझेस 'एकच लक्ष'! काँन्संट्रेशन. सिंन्ग्यूलर मिशन. ध्येय.
रमी (जूगार), म्हणजे अर्थाअर्थी पत्ते, मटका नव्हेत. तर रमी सिम्बोलायझेस रिस्क. चान्सेस. डेरींग. करून बघणे. नव(अ?)साध्य गोष्टी?!
या, रम, रमा व रमी, गोष्टी, आपल्याला सतत शिकवत असतात. घडवत असतात. नवनव्या संधी(ज) उपलब्ध करून देत असतात. पण जर, या तीन "आर" चा योग्य तो समतोल वापर करता आला पाहीजे, तर व तरच, गरूडझेप मारता येते.
आsss र र र...
---
Milinnd Kale, 13th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment