Er Rational musings #564
#मिलिंन्दमोरेश्वरकाळे
वय 18 वर्ष 9 महिने फक्त.
अपाँईंटमेंट लेटर घरी येतं. शैक्षणिक अर्हता, व प्रत्यक्ष मुलाखत हा रेफरन्स दिलेला.
पोस्ट आँफर्ड: टेक्निकल अँप्रेंटीस (टीए)
प्रोबेशन: 6 महिने
स्टायपेंड: 300 रूपये (महिना!)
आँन सक्सेसफूल कंम्प्लीशन, 1200 रूपये पगार, कायमस्वरूपी नोकरी!
मी ते नाकारल, मनात म्हणलं, च्यायला, 300 रू काय? दिवसाला 10 रू?!!
महिन्याभरात, दूसरं पत्र घरी.
पोस्ट आँफर्ड: सिनियर स्टायपेंडरी अँप्रेंटीस (एसएसए)
प्रोबेशन: 6 महिने
स्टायपेंड: 900 रूपये (महिना!) दिवसाला 30 रू!!!
आँन सक्सेसफूल कंम्प्लीशन, 1200 रूपये पगार, कायमस्वरूपी नोकरी!
मी म्हणलं, हां हे ठीकाय!
अशातर्हेने अस्मादीक बेस्ट मध्ये - बृहनमुंबई ईलेक्ट्रीक सप्लाय व ट्रान्सपोर्ट (बीईएसटी) मघ्ये सिनियर स्टायपेंडरी अँप्रेंटीस (एसएसए) म्हणून रुजू झाले.
तो सोनियाचा दिवस (माझ्यासाठी हां!) होता 12th जून 1984, म्हणजे बरोब्बर 32 वर्षांपूर्वी!
हँप्पी वर्क अँनिव्हर्सरी टू मी!!
नुकतीच मिसरूड फूटायला लागली होती. (हं, शिंगं मात्र चांगलीच फूटली होती) अजून शिकायची ईच्छा होतीच. पण, जस्ट बघूया म्हणून केलेला अर्ज व नंतर झालेली निवड व समोर आलेली नोकरी; म्हणलं करूया; पूढील शिक्षण एक वर्षानी. नोकरी कधीही सोडता येईल, काय हरकत आहे, करून बघायला? आणि बेस्ट बसेसनी आख्या मुंबईत फुकट प्रवास, कितीही वेळा, कधीही, कुठेही; हे आकर्षण पण होतच ना.
पहिला पगार, पहिला स्टायपेंड, कसा विसरता येईल?
जून 1984 चे अठरा दिवस भरल्यावर (!) एक जुलैला सँलरी - पे पँकेट हातात! सहाशे एकोणीस रूपये चोपन्न पैसे, वजा प्रोफेशनल टँक्स सहा रूपये वीस पैसे, राऊंडआँफ अँडजस्टमेंट सहासष्ट पैसे. व हातात रोकडा कँश रूपये सहाशे चौदा!! माझा पहिला मंथली पगार!! ऐश; मग पूढचे सहा महिने हजारच्या वर रूपये नगद हातात. वाँव, मस्तय ना?
बेस्ट मधील नोकरी हे माझं पहिलं प्रेम. आयलंड सिटी आँफ मुंबई, म्हणजे सायन ते कुलाबा आणि माहीम ते बँकबे, या भागाचा वीज पुरवठा (वितरण), बेस्ट कडे.
ईलेक्ट्रीकल कोअर फिल्ड मघ्ये काम करायला मिळालं. खूप शिकायला मिळाल ते इथेच. खूप माणसं जोडली गेली, ज्यांच्याशी मी आजही इतक्या कालावधीनंतरही संपर्कात आहे. महत्वाचं म्हणजे बीईएसटी - बेस्ट मुळे, साध्य झालेला नव्हे करावाच लागलेला, अनिवार्य असा, मुंबईतला अक्षरशः मुक्त संचार; ईमर्जन्सी ड्यूटी मुळे रस्तोरस्ती गल्लोगल्ली फिरण हे होतच, ते ही चोवीस तासात कुठेही कधीही. आणि आम्हाला लोकांकडून, हाँटेलांत, थिएटरात, अगदी कुठेही अक्षरशः, स्पेशल ट्रिटमेंट पण! आम्ही व्हिआयपी.
त्यावेळी, वीज वितरणात बेस्ट ही पूर्ण भारतात बेस्ट होती. एक नंबर. वीज गळती वा वीज चोरी सर्वांत कमी. बेस्टची पाँवर डिस्ट्रिब्यूशन सिस्टीम तगडी होती, जमिनी खालील वीज वाहिन्यांचे प्रचंड जाळ तेव्हा फक्त माझ्या बेस्ट कडेच! टेक्नीकली स्ट्राँग मँनपाँवर (इन हाऊस, नो आऊट-सोर्सिंग), कमीटेड स्टाफ, कार्यतत्परता, आणि उत्कृष्टरित्या प्लँन केलेलं (पूढच्या पंचवीस तीस वर्षांची मुंबईची ग्रोथ लक्षात घेवून) पाँवर सप्लाय नेटवर्क, ही बेस्टची काही बलस्थानं!
माझ्यासाठी अत्तिशय, सर्वोच्च महत्वाचे म्हणजे मुंबईशी निर्माण झालेली जवळीक, आपलेपणा. मुंबई मला खरी दिसली, मुंबईची माझी खरी ओळख झाली, आणि मी मुंबईच्या कायमचा (प्रचंड) प्रेमात पडलो, तो केवळ या बेस्ट मुळे!!
पहिली नोकरी पहिलं प्रेम 💕
धन्यवाद बेस्ट, यू आर स्टिल "द बेस्ट!!"
आँल द बेस्ट...
---
Milinnd Kale, 12th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment