Er Rational musings #584
केळवण म्हणजे अँक्च्यूअली स्पिकींग, लग्न ठरल्यावर, होणाऱ्या नवरदेवाला वा नववधूला, त्याच्या वा तिच्या आई वडील व बहिण भावंडासह घरी बोलावून त्यांच्या आवडीचे काही खायला प्यायला देणे. लग्नाआधी एकत्र सगळ्यांनी भेटण्याचे कारण एकच असावे, की आता दोनाचे चार (हात) झाल्यावर, 'अश्या' भेटीगाठी गप्पाटप्पा कमी होणार!
अनेक मित्र ग्रूप्स पैकी माझ्या मुलुंड च्या आमच्या ग्रूप ची आम्हीच एक प्रथा पाडली होती. एकाचं लहानपणापासूनचं (!) लव्ह, मग सगळ्यांच्या आधी मँरेज. एकदोघांचं लहानपणापासूनचं (!) लव्ह, जीवापाड, पण एकतर्फी; अव्हेरल्यामुळे, धुडकारल्यामुळे मँरेज नाही! असो.
आमच्यात कोणाचे लग्न ठरले की त्याचे केळवण सगळ्यांनी मिळून त्या एकट्याला, हाँटेल मध्ये. दारू काम. सामिष मेजवानी; व लग्नानंतर 'त्या' दोघांना काँमन जाँईंट पार्टी, कोणाच्यातरी घरी. अर्थातच अपेय पान व अभक्ष भक्षण. (नवीन मेंबर ला सवय नको का व्हायला, 'असल्या' पार्ट्यांची व सगळ्यांची?!)
पण या पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे शँम्पेन! एक शँम्पेन ची बाटली फोडायची व सर्वांनी उष्टवायची हा प्रघात. त्याचं बूच उघडायच एक विशिष्ट टेक्नीक आहे; मग ते बूच टप्पकन्न उंच सिलिंग पर्यंत उडवायचं. पण बाटली हलवून, फेस बिस न आणता, एकेक घोट सगळ्यांच्या पेल्यांत ओतायचे. चषक एकमेकाला भिडवायचे, हलके आपटायचे मंजूळ स्वरात. आधीच लग्न झालेले मित्र व त्यांच्या बायका, लग्न व्हायचे बाकी असलेले एकेकटे, व नवीनच लग्न झालेला मित्र व त्याची बायको, एकसूरात एकदिलात, एकत्र.
"फाँर हेल्थ, वेल्थ, हँपीनेस व सक्सेस!"
नंतर आपापले ब्रँन्ड. चीअर्स...
---
Milinnd Kale, 23rd June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment