Er Rational musings #566
गणपती येतील पावसाळ्या नंतर. आमच्या इथे सार्वजनिक गणेशोत्सव जरी नसला, तरी, ज्या काही आमच्या इथल्या चार पाच घरांत गणपती यायचे, तेच सार्वजनिक होऊन जायचे. आमच्याकडे दीड दिवस, इतरांकडे पाच किंवा गौरीं बरोबर जाणारे. मग दिवस ठरवायचा, व आरत्या म्हणायला प्रत्येकाकडे एकापाठोपाठ एक.
सगळ्या आरत्या, सगळ्यांकडे म्हणायच्या. एकाकडे संध्याकाळी सुरू केलं, की शेवटच्या घरून आपापल्या घरी जायला चांगलीच रात्र झालेली असायची. विसर्जन सुध्दा एकत्र, तिसऱ्या वाडीतल्या विहीरीत. सतीश सोमण उतरायचा दर वर्षी.
माझ्या एका नोकरीच्या कालखंडात, आँफीस मध्ये पाच दिवसांचा गणपती बसवायचे. दूपारची पूजा एकत्र. रात्रीची हाऊसकिपींग वाले करायचे. झाडून सगळ्या (वेल, बऱ्याचशा!!) आरत्या तोंडपाठ असल्याने पूढाकार असायचा.
थोड्ड वेगळं असायच इथे आँफीस मध्ये पण...
~ शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
जय देव जय देव... ॥ जय देव० ॥
ही आहे आम्हा दीड दिवस गणपतीवाल्या भटांकडची आरती.
आता इथे आँफीस मध्ये "ओ स्वामीशंकरा" अँड केले जायचे, करावे लागायचे, "जय देव जय देव जय श्रीशंकरा ।" नंतर...
~ घालीन लोटांगण
घालीन लोटांगण वंदीन चरण |
डोळ्यांनी पाहिन रूप तुझें ||
प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन |
भावें ओवाळिन म्हणे नामा || १ ||
लास्टच हे आहेना,
हरे राम हरे राम राम राम हरे हरे |
हरे क्रुष्ण हरे क्रुष्ण क्रुष्ण क्रुष्ण हरे हरे || ५ ||
त्यात किती वेळा
हरे राम हरे राम राम राम हरे हरे |
हरे क्रुष्ण हरे क्रुष्ण क्रुष्ण क्रुष्ण हरे हरे ||
म्हणायचं, याला काही परिमाण नाही; तीन पाच वेळा म्हटलं जायचं.
~ मंत्रपुष्पांजलि
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् |
ही आहे अर्थातच, आरत्यांच्या शेवटी म्हणायची मंत्रपुष्पांजलि.
आता इथे आँफीस मध्ये "सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचि आता..." हा श्लोक अँड केला जायचा, करावा लागायचा! मंत्रपुष्पांजलि ऐवजी...
नथींग राँग, भावना महत्वाची...
---
Milinnd Kale, 14th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment