Er Rational musings #582
आर्टिफिशियल पुष्प गुच्छ (बूके) कधी जन्माला आले हा संशोधनाचा विषय ठरेल. नानाविध प्रकारची, नानाविध साईज मध्ये, नानाविध खऱ्या खोट्या फूलांचे बूके रस्त्या रस्त्यावर मिळतात. तो एक चांगलाच बस्तान बसलेला व्यवसाय प्रकार झालाय; मल्टी लाख रूपयांची नक्कीच उलाढाल होत असणार डेली!
"कृपया आहेर आणू नये", "आपली उपस्थिति / आशिर्वाद, हाच आमचा आहेर", असं छापायला लागले पत्रिकेमध्ये. (जवळचे नातेवाईक घरचा आहेर तसेही देतातच, ती गोष्ट अलाहिदा!!) त्यातनं मार्ग म्हणून, व रिकाम्या हातानी कसं जायच या भावनेतून लोकं पुष्प गुच्छ घेवून यायला लागले!
लाल, पांढरी, पिवळी फुले, तुरे, पान बिनं वापरून, व अतिशय आकर्षक गोंडे बांधलेल्या प्लँस्टिकच्या वेष्टनात मिळालेले ह्हे एव्हढे बूके समारंभानंतर घरी घेऊन जायचे हा एक कार्यक्रमच असतो. बर एव्हढं करून हे घरी ठेवायचे कुठे, हीही एक वेगळीच समस्या. पण दिसतात छान, व जरा चांगलच फ्रेश वाटतं, यांच्या सान्निध्यात.
हल्ली एक पाऊल पुढे टाकत, "कृपया आहेर वा पुष्पगुच्छ आणू नये, आपली उपस्थिति / आशिर्वाद, हाच आमचा आहेर" असं ठळकपणे म्हणावं लागतय. असो.
फूल ना फूलाची पाकळी म्हणून xxx xxx तमुकअमुक देण्यात येतआहे.
ही मात्र एक निराळीच बोळवण असायची...
---
Milinnd Kale, 22nd June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment