Er Rational musings #555
पानाच्या टपरीवर उभं राह्यलं की दूनिया कळते. सुधीर उवाच.
हा सुधीर म्हणजे माझा गेल्या पस्तीस वर्षांपासूनचा मित्र. इंजिनियरिंग काँलेजमध्ये माझ्याबरोबर. तेव्हा अर्थातच सिगारेटी ओढायचा आमच्याबरोबर, क्वचित प्रसंगी बिड्याही! दारू ओघाने आलीच; पण पठ्याचे पहिले व फोरमोस्ट प्रेम तंबाखूवर. तेव्हापासून, आजमितीस हा माणूस छानशी मळलेल्या तंबाखूची गोळी गालफडात ठेवून जगतोय, होय अक्षरशः जगतोय. चोवीस तासांपैकी झोपेची व खायची वेळ सोडली, तर याचा आपला बार भरलेला. हा तोबरा तोंडात ठेवूनच मायन्यूट काँन्संट्रेशन होत या बाप्याचे. गायछाप साला.
परंतु, त्याच तत्वज्ञान मात्र तंतोतन भारी आहे. कुठल्याही पानटपरीवर उभं राहीलं की म्हणे दूनिया समजते! व्हाँट अँन अँरोगंट स्टेटमेंट! हा, हे खरय की, कुठल्याही नाक्यावर उभं असलं की काहीनाकाही मँटर बघायला वा ऐकायला मिळतोच. कित्ती अनेक प्रकारची माणसे ध्यानास पडतात. प्रत्येक जण वेगळा, यूनीक. कपडे, हातातल्या पिशव्या बँग्ज, चप्पल बूटं, केसांची स्टाईल, बोलण्याची लकब, एकंदरीत बाज ढंग माज साज. एकटे लोक्स असे, तर दूकटे तिकटे यांचं निराळच रूपडं, आपसातल्या गप्पा, हसण खिदळणं, इ. इतकच काय, तर, सिगारेट शिलगावण्याची पध्दत, सूट्टे पैसे ठेवण्याची जागा (काही जणं, आपल्या वाँलेट मध्ये कप्यात ठेवतात व्यवस्थित वा काही लोकं नुसतेच खिशात, खूळ्ळूक खुळ्ळूक!)
दुनिया 'उलगडायला' वेळ नाही लागत.
मँनेजमेंटच्या कोर्सेस च्या नावाखाली जी थियरी शिकवली जाते, प्लस कसली ना कसली अँब्रप्टली प्रेझेंटेशन्स करायला सांगतात वा प्रँक्टीकल्स म्हणून आँफीस वर्क कल्चर / फँक्टरी इंडस्ट्री व्हिजीट बिजीट च्या बरोबरीने (ऐवजी नव्हे), अशा वर्दळीच्या रस्त्यांवर, नाक्यावर, पान टपरीवर दोनेक तास नुसतं उभं जरी केलं तर कस हौईल?
आँन द जाँब ट्रेनींग, आँन लाईन एक्स्पिरियन्स, आँन देअर टोज...
---
Milinnd Kale, 8th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment