Er Rational musings #586
मधनमधनं मी "स्वाँट अँनँलेसिस" करत असतो. व्यवस्थापनाच्या भाषेत बोलायच झाले तर स्वाँट अँनँलेसिस म्हणजे 'स्ट्रेन्ग्थ, वीकनेस, आँपोर्च्युनिटी, थ्रेट' चा परामर्श.
आपल्या स्वत:एव्हढे आपल्याला दूसरी कोणतीच व्यक्ति जवळून ओळखत नसते. आपल्याला शिकवले पण जाते ना, की मधूनमधून आरशात स्वत:ची छबी 'बघा', निरिक्षण करा!
(स्वत:ची) बलस्थानं, कमकुवतपणा, संधी व धोका ह्या गोष्टी टप्याटप्यावर तोलल्या की प्रवास सुखकर मार्गकर(!) होतो, असे मला वाटते. अर्थातच, नुसते अँनँलेसिस करून काय उपयोग? टाईम बाऊंड अँक्शन प्लँन हवाच जोडीला, टू टेक ग मँटर्स टू इटस् लाँजिकल कन्क्लूजन!
ओळखा पाहू आपापली शक्तीस्थानं, आपली कमी बाजू, आपल्याला उपलब्ध होऊ घातलेल्या / पुढ्यातल्या संधी, आपल्या समोरील संभाव्य धोके.
मग त्यातनं उगम होईल "पूनी" - 'प्रायाँरिटीज, अर्जंन्सी, नीड, इंम्पाँर्टंट' गोष्टींच्या अँक्शन प्लँन चा. प्राधान्याने निकडीच्या गोष्टी, तातडीच्या बाबी, गरजेच्या बाबी, व महत्वाच्या गोष्टी; या वेगवेगळ्या सेग्रेगेट करणे व हातावेगळ्या करणे; हेच तर आहे. सार.
आज मँनेजमेंटचे फंडे! करून तर बघा.
सिस्टेमँटिकली रिअलँस्टिक...
---
Milinnd Kale, 23rd June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment