Saturday, June 18, 2016

Er Rational musings #576

Er Rational musings #576



A शेतकऱ्यांच्या आत्महत्या

B असंघटित कामगारवर्ग

C इन्कम टँक्स (सँलरीड पीपल)

D काँर्पोरेट टँक्स व इतर टँक्सेस

E कारखानदारीतील परवाने, पर्मिटस्

F स्त्रीयां वरील अत्याचार व शोषण

G वरिष्ठ नागरीकांची असुरक्षितता, पेन्शन

H बी बियाणं, कृषी उत्पादन व विक्री

I पायाभूत सुविधा

J ईशान्य पूर्व राज्ये

K जम्मू व काश्मीर

L दहशतवाद व सुरक्षा

M दूष्काळी संकट

N अपघातसत्र

O घटणारे व्याज दर

P निवासी जागांची स्वस्त उपलब्धता

Q वीज व पाण्याचा तुटवडा

R शुध्द हवा, जनतेचे सामाजिक आरोग्य

S वाढती लोकसंख्या

T दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या

U जातीय व धार्मिक ताणतणाव, दंगे

V बेरोजगारी

W भ्रष्टाचार

X ब्रेन ड्रेन, उच्चशिक्षणासाठी परदेश गमन

Y आत्मकेंद्रित व सूडाचे राजकारण

Z अभिव्यक्ति स्वातंत्र्य



26 अल्फाबेटस्, 26 समस्या. पूष्कळ आहेत अजूनही; या फक्त प्रतिनिधिक, भेडसावणाऱ्या, छळणाऱ्या, टोचणाऱ्या बोचणाऱ्या. अल्फाबेटस् ठीकायेत, सव्वीसच आहेत, पण न्युमरल्स च काय? शून्यापासून इन्फायनाइट? संख्या किंवा चिन्हं किंवा त्यांच काॅम्बिनेशन.



आणि ही न्युमरिकल समस्या आहे "महागाई"!!



प्लेन, सिंपल, बाँटमलाईन.



जीवनावश्यक वस्तू, मग ते तेल असो वा भाज्या वा डाळ वा मीठ, स्वस्त व स्थिर व सहज उपलब्ध झाल्या पाहीजेत. आणि हीच, फर्स्ट व फोरमोस्ट जबाबदारी आहे, सत्ताधीशांची.



फाँरेन पाँलिसी, भारताची प्रतिमा, परदेशी सहकार्य, सलोखा वगैरे महत्वाचेच आहे, प्रश्नच नाही. त्याचबरोबर, सामान्य नागरिकांना नको कसल्या गँस बिस च्या सबसिड्या. सरसकट सगळं अन्न धान्य फक्त आटोक्यात ठेवा सगळ्यांच्या.



बाकी तुमचं चालूद्या...

---

Milinnd Kale, 18th June 2016

No comments:

Post a Comment