Er Rational musings #594
हं, बोल काय खाणार, कुत्र्याची छत्री की हुरडा? की आपलं नेहमीचच घासफूस? आमच्या अहोंचा कटाक्ष (जळजळीत नव्हे ओ; प्रेमाचा ओलावा तो!! तुम्ही पण ना, काहीपण मनात आणता बुवा!) - कालचाच किस्सा. हाँटेल मधला (सु)संवाद.
या प्युअर व्हेज वाल्यांचं कौतुक वाटत मला. कसलं गवत व झाडं झूडपं पानं खातात! आमच्या अहो म्हणजे मायाबाई ह्या नखशिखांत व्हेज. मी नेहमीच सांगतो यांना, की अहो, एकदातरी चिकन ची लज्जत चाखा, फारतर सुरणाची वा फणसाची भाजी उमजून खा, पण खा; नाही आवडलं, सारख सारखं नाही खाल्लं तर (नाव नाही बदलणार), पण काही तरी करीन बघ! बाहेर गाड्याबिड्यांवर वगैरे ठीकाय, प्रचंड व्हरायटी अँव्हेलेबल असतेय. परंतु जर्रा बऱ्यापैकी रेस्तराँत गेल तर चांगलीच गोची.
आणि, माझे फेवरीट प्लेन सिंपल आलू मटर वा चना मसाला वा फारतर ग्रीन पीज मसाला यांचे दिवस संपलेत - (आय एम गेटींग ओल्ड, बहुतेक!!).
कुत्र्याची छत्री उर्फ मशरूम(!), व हुरडा उर्फ कणसाचं पिल्लू उर्फ बेबी काँर्न, यांनी तर नुसता उच्छाद मांडलाय. जिकडे तिकडे चोहीकडे. नाहीतर आहेच पनीर. ज्यातत्यात नुसतं पनीर; नाहीतर आहेच बटर, ज्यातत्यात हे एव्हढे लोणी; नाहीतर आहेच नवीन पदार्थ आँन द ब्लॉक - व्हेज क्रिस्पी - भाज्यांची भजी नाही म्हणायचं भाऊ, प्राँब्लेम येईल; नाहीच नाहीतर तर आहेच गरगटं - मिक्स व्हेज वा व्हेज हंडी (हंडीच्या आकाराच भांड म्हणून हंडी नाहीतर व्हेज तांब्या म्हणायला हरकत नसावी!!) - भाज्यांच कालवण! बरं, चांगलं नाँन काँन्ट्रोव्हर्शियल आलू पराठा मागवावा, तर तो असतो 'तंदूरीमें', 'तवावाला' नाही! मग उरतय ते डाळ भात, साँरी, डाल खिचडी(!) त्यातल्या त्यात, तडका मारके!! (आता म्हणू नका ओ, की बाहेर जावून खिचडी कसली खायची; असला (कुत्सित) प्रश्न मनातही आणू नका, आय एम वाँर्निंग यू; आतातर स्फोटच होईल). 'अहोधरणी' कंपा ला म्या लईच घाबरतो बा!
ह्या प्यूअर व्हेज वाल्यांमुळे निसर्गाचा ऱ्हास होतोय, उलटं आम्ही निसर्ग संतुलन राखतोय (!) असा काहीसा विचार मनामध्ये येऊन गेला; मी झटकला तो अर्थातच, रिडीक्यूलस.
मी आपला साधा माणूस, बापूडा, खाली मान घालून माझी आँर्डर वेटरला दिली.
एक चिकनमसाला, दो प्लेन रोटी - कडक.
आणि गोविंद म्हटल...
---
Milinnd Kale, 28th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment