Monday, June 6, 2016

Er Rational musings #551

Er Rational musings #551



सकाळ्ळी सकाळी वर्तमानपत्रात ठळक बातमी. 17 ठार, 25 जखमी, त्यातही 8 जणं अत्यव्यस्थ, प्रकृती गंभीर. जखमींना अमुक तमुक रूग्णालयात दाखल.



सारख्या असल्या बातम्या. मन अस्वस्थ होतं. काय असेल त्या निष्पाप जीवांचा दोष? अती घाई संकटात नेई. हेच खरे. एक झापड, वेगाची झिंग, का निव्वळ निष्काळजीपणा.



आपण फक्त मृतांची पहिेले, नंतर जखमींची नावे वाचायची, आपल्या ओळखीपाळखीचे कोणी आहेत का, याची भितीयुक्त उत्सुकतेने खातरजमा करायची, व नसलं कोणी माहितीचे, की हुश्श म्हणायचे. चुचकारायचे, हुळहुळायचे, च्च च्च म्हणायचं, व मान आडवी तीन पाचदा हलवायची.



हम्म्म, हे असेच चालायचे असे म्हणून, कामाला लागायचे...

---

Milinnd Kale, 7th June 2016

No comments:

Post a Comment