Er Rational musings #588
मी कानसेन. आम्हा कानसेन लोकांचे एक बरे आहे. कुठेही कधीही उत्तम गाणं, संगीत कानावर पडलं, की आपोआप डोळे मिटतात, डोकं हलायला लागतं, पावलं ठेका धरायला लागतात, हात सुध्दा दाद द्यायला सज्ज असतात; कानपटलांवर स्वर ताल लय सूर आपटत असल्यामुळे रेझोनन्स ने सर्व गात्रांतून ईको येतो! पेंन्डूलम जणू.
लाडकी माझी सहेली, म्हणजे एकमेवाद्वितीय दारू, आता कायमचीच बंद!! सोडून दीड पावणेदोन वर्षे होतील. पण शिरस्ता कायम आहे. रात्र आपलीच असते मैफलीची. आज सोनी मिक्स वर जी गाणी लागलीहेत; अहाहा. माशाल्ला.
सूख, स्वर्गीय सूख काय ते अशा ट्रान्समध्ये अनुभवता येतं. ब्रम्हनंदी टाळी!!
पाऊस बाहेर, गार हवा चक्क, पोट भरलेलं, दमलेली पण ताजीतवानी काया, पाय लांब, मिणमिणता दिवाउजेड, आपला इडियट बाँक्स, व एकसेएक तानसेनांना ऐकायला माझ्यासारखे कानसेन.
ये ज़िंदगी ना मिले दूबारा रे, त्रिवार सत्य!
तुष्ट तृप्त आत्मा...
---
Milinnd Kale, 23rd June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment