Wednesday, June 1, 2016

Er Rational musings #542

Er Rational musings #542



सुप्रभात, शुभ सकाळ, good morning @ll.



पावणे सहाचा गजर त्याचं काम करून निघून गेला. मी माझ्या हातांनी तो बंद करण्याचे काम यंत्रवत केले. सहा नऊ मिनिटांनी व्हाँट्सअँप खणखणायला लागले, आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत. डोळे किलकिले करत हात उशाशी नेवून या अद्भूत गँजेटला 'कर लो दूनिया मूठ्ठी में' सारखं कुरवाळण्या शिवाय पर्याय नव्हता. एखाद्या पाळीव प्राण्या प्रमाणे सोनी एक्स्पेरिया माझ्या अवती भवती असल्यामुळे त्यावाचून जगणे अशक्य असल्याची परत एकदा जाणीव झाली!



गूड माँर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ, शुभ प्रभात, असले सगळे ग्रूप्स मंजूळत दरवळत होते. हिरवी झाडे झुडपे, सुंदरसे पुष्प गुच्छ, मित्रत्व 'दोहरावणारे' सुविचार वगैरे ची ही काही कमतरता नव्हती. मन प्रसन्न झाले! गुरूवार असल्याने सर्वश्री दत्त गुरू, साई बाबा, गजानन महाराज, स्वामी महाराज इ देवांच्या, सिध्द पुरूषांच्या दर्शनाने पावन झालो.



मी सुध्दा सगळ्यांना गुड मॉर्निंग केले. खोडेसे रूक्षच असते हे माझे, पण एकाच वेळी सव्वाशेदोनशेएक ओळखीच्यांशी संवाद करता येणं हे अजब सुलभच. व चहाचा सुगंध नाकांत कानात (!) अलगद घुमायला लागला!!



कसलं पाल्हाळ लावलय, साधं हाय गुड मॉर्निंग म्हणायचं सोडून, असले फटके ऐकावे झेलावे लागणार, ही रिस्क तर आता आहेच.



असो, भावना पोचल्या, पोहोचवतोय इतकच.



आपला दिवस सुखद शुभ आनंदात जावो, माझ्या खूप खूप शुभेच्छा...

---

मिलिन्न्द काळे, 2nd June 2016

No comments:

Post a Comment