Er Rational musings #552
पोळी आणि भाजी (चपाती भाजी). नोकरदार व व्यावसायिक, यांचा हा (बहुतेकांचा) दूपारच्या जेवणाचा नाँर्मल डब्बा. कधी चेंज म्हणून डोसे उत्तप्पे इडली, पराठे, पाव भाजी, पुलाव बिलाव सदृश एखादा भात इत्यादि इत्यादि. पूर्वी गिरणी कामगार व अजूनही काही जणं तो ट्रिपल डेकर गोल टाँवर क्लिप वाला डब्बा नेतात, पोळी भाजी आमटी भात वगैरें सकट, नाही असं नाही. बरं, कधीमाधी एखाद काहीतरी गोड, वा कांदा काकडी गाजर टोमँटो इ, वा चटणी लोणचं कोशिंबीर इ, वा सेपरेट ताक दही बिही, वा एखादं केळं बिळं, असलं कायकाय असतं; पण जनरली, टिफीन म्हटलं की भाजी पोळी.
मला नेहमीच प्रश्न पडत आलाय, व अजूनही पडतो, की या दोहोंमध्ये भाजी चे प्रमाण अत्यल्प का? अगदी एव्हढूशीच टीचभर भाजी, व त्याचबरोबर 3-4 तरी पोळ्या/चपात्या, कशा काय (व का) खाल्या जातात?! कोरड्या नाही का लागत? डब्बा जर चपटा सिंगल असेल, तर संपलच; म्हणजे भाजीचा बिल्ट इन कप्पा एव्हढास्सा त्यात!
भरपेट नाश्ता, माफक लंच व लाईट डिनर असं शिकवलं जातं आपल्याला. परंतु आता जीवनशैली आमूलाग्र बदललीये. नाश्त्याला वेळ कुठाय? आणि, रात्री तर सडकून भूक लागलेली असते, दिवसभराच्या धावपळीने, कामाने. दूपारचं जेवण तगडच हव बर का.
नुसती पोळी भाजी नेत असाल तर, वा तसेही, भाजी भरपूर पाहीजे, एक सिंगल डब्बा भरेल एव्हढी. भाज्या वा उसळी योग्य पुरेशा प्रमाणात खाल्याच गेल्या पाहीजेत.
पोळ्या संपवून भाजी उरली पाहीजे, जी नुसती खाल्ली पाहीजे.
आय मिन, इतकीी क्वान्टिटी हवी च...
---
Milinnd Kale, 7th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment