Thursday, June 30, 2016

Er Rational musings #596

Er Rational musings #596



फेसबूक वर, स्वत:च्या भिंतीवर, पोस्टी शेअर करणारे लोक्स प्रचंड हुशार असतात. एव्हढ्या मोठ्ठ्या मायाजालातन, वेचक वेधक पूरक तारक कविता वा फोटो वा व्हिडियोज शोधणं, निवडणं हा एक महाजंजाळ उद्योग आहे. दिवसागणीक रतीब पाडतात बाँ!



याव्यतिरिक्त काही लोक्स असे असतात, की दोनतीन दिवसांतन एक स्वलिखित पोश्ट. हे जनं, प्रतिसाद लाईक्स काँमेंटस् स्माईली बिईलींसाठी पुरेसा वेळ देतात फ्रेंन्ड सर्कल ला. हे लोक्स प्रचंड हुशारी बरोबरीने प्रसंगावधानी देखील असतात.



याशिवाय काही लोक्स काँमेंटस् करण्यातच पारंगत असतात. वफा़दार दोस्ती निभावतात, ईतर दरेक पोस्टींवर काँमेंट मारून. हे लोक्स प्रचंड हुशार, प्रसंगावधानी बरोबरीने संभाषणचतुर देखील असतात.



याबरोबर काही लोक्स सब्जेक्ट मँटर एक्सपर्ट असतात. राजकारण, गाणी, खेळ, चित्रपट, खाद्ययात्रा, जंगलफिरे फोटोकाढे, वा निव्वळ इनोद वाले (आता हे विनोद आँलरेडी व्हाँट्सअँप वर फिरफिरून गेलेले च असतात, ही बाब अलाहिदा!), व्यवसाय उद्योग, शेती इत्यादि इत्यादि विविध विषय तज्ञ असतात. हे लोक्स प्रचंड हुशार, प्रसंगावधानी, संभाषणचतुर बरोबरीने जाणकार देखील असतात.



याउप्पर काही लोक्स प्रचंड हुशार, प्रसंगावधानी, संभाषणचतुर, जाणकार बरोबरीने अतिशहाणे, अतिउत्साही व अंमळ अतिच देखील असतात.



आता हे लोक्स कोण, म्हणजे अस्मादीकांकडे उंगलीनिर्देश केलाच पाहीजे, असच काही नाही...

---

Milinnd Kale, 30th June 2016

No comments:

Post a Comment