Er Rational musings #550
माझा पाळीव प्राणी बदलावा म्हणतोय. नाही, नाही; दचकू नका, वा RIP, भावपूर्ण श्रध्दांजली, इत्यादि पोस्टस् चा व्हाँट्सअँप वरनं मारा करू नका, प्लीज. हा प्राणी अगदी ठणठणीत, तुकतुकीत आहे. काळजी नसावी. माझा 'पेट' शत् प्रतिशत परफेक्ट आहे. ईश्वरकृपेने. पण ह्याला मात्र बदलणारच;
बदलायचे कारण काय, तर हँकींग चा धोका! आता हे काय नवीन? हायजँक नव्हे! म्हणे, पाळीव प्राण्याला कोण व कशासाठी व कसे काय हँक करेल? थांबा थांबा. प्रश्नांची सरबत्ती करू नका.
त्याच कायए ना, एका मोठ्या मंत्र्याला राजीनामा द्यावयास भाग पाडले ओ, या हँकींग च्या घटनेनी. तर्कशुध्द पुढचा प्रश्न, 'त्यां' चा व माझ्या पाळीव प्राण्याचा काय संबंध? आहे, आहे, डायरेक्ट रिलेशन नसले तरी बादरायण संबंध नक्कीच आहे. अशी आवई उठवली गेलीये की आपापला पाळीव प्राणी हा 'ओव्हर स्मार्ट' नसावा. म्हंजे त्यो हँक बँक न्हाय व्हत.
अगदी साधासुधा बेसीक, म्हणे! त्याने त्याचं आद्य कर्तव्य च (फक्त) बजावलं पाहीजे; कुठेही लुडबुड नको! इतर कुठल्याही गोष्टींचा तसा याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना, या बिचाऱ्यावर किती ताण दिला जातो; ही वस्तुस्थिति आहे. याला हे पण आलं पाहिजे, याला ते पण आले पाहीजे, निव्वळ, शुध्द अट्टाहास!
याचं मेन काम आहे ते दूसऱ्याशी संपर्क ठेवणं. ध्वनि देवाणघेवाण, बाकीचं सग्गळं अँड आँन!!
बरोब्बर ओळखलत, माझा हा पाळीव प्राणी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तो आहे माझा स्मार्टफोन! कायऐना, फोनच काम सोडून इतरच कामं जास्त करायला लागलाय, बघा की. म्हणजे ते काय कँलेंडर, कँमेरा, कंपास, क्लाँक, कँलक्यूलेटर, काय काय. मंग ह्यास्नी कोनी हँक करूनशान माझ्या अब्रूचे वाभाडे काढले तर? आँ?
दीडएक हजारातला, छोट्टासा, छोट्टीशी स्क्रीन व नंबर दाबायला बटणं (!) असलेला, हँडसेट घ्यावं म्हणतोय. नो खिचखिच नो झिगझिग.
(ओव्हर) स्मार्ट फोन = पाळीव प्राणी, ह्यो लय, बरिक खरं हाय...
---
Milinnd Kale, 6th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment