Tuesday, December 29, 2015

Er Rational musings #298

Er Rational musings #298



खऱ्या खवय्यांनी भूजींग खायला पाहीजे.



भूजींग! अँब्सोल्यूट मार्व्हलस्. सूपर्र्रब. डिव्हाईन. ट्रेमेंडस्. व्वाँव. आणि आत्ताच्या भाषेत खाऊन झाल्यावर "आँसम" व "फिलींग ब्लेस्ड" का काय ते!



ताजे व गरमागरम मिळण्याची ठिकाणं म्हणजे आगाशी, वसई, विरार, नायगाव परिसर व इथल्या वाड्या. कोणी क्रिस्ताव ओळखीचा असेल इथला, तर आवर्जून वेळ काढून जा. येथे भूजींग घराघरात केले जाते. कोळश्यावर पण बनवतात काही ठिकाणी.



रेसीपी यूनीक आहे. चिकन भाजलेलं वाफाळलेलं असताना त्यात बटाटे, कांदे, मिरची, लसूण इ इ घालून व विशिष्ट होम मेड मसाल्यात, व पोह्यात (!), हो (जाडे) पोह्यात, मिक्स करायचं. आता हीच तर खरी गोम आहे. मसाले, पोहे, इतर इनग्रेडिएेंटस् आणि मिक्सिंगचे प्रमाण! यूएसपी! यूनीक सेलींग पाँईंट!!



हा खाद्यप्रकार पार्सल वगैरे मागवून खायचा अजिबात नाहीये. तिथे जाऊन हादडा.



It's worth it...

---

मिलिंद काळे, 29th December 2015

No comments:

Post a Comment