Er Rational musings #254
...बाबूभाई जगजीवनदास, सूटींग शर्टींग, ड्रेस मटेरियल सारीया...
...वाँशिंग पावडर निरमा, निरमा...
अशाच इतर जाहीराती, पण
...भिंतीवरी कालनिर्णय असावे!
ही मात्र जिव्हाळ्याची, घरगुती जवळची उपयुक्त!
आठवतय ना? बूट चपला म्हणजे बाटा, टूथपेस्ट म्हणजे कोलगेट तसंच कँलेंडर म्हणलं की कालनिर्णय, असेच बऱ्याच अंशी आजही आहे.
कँलेंडर व घरातली सगळी मंडळी यांचे एक वेगळेच नाते होते. दूध, पेपर, इस्त्री व सटर फटर नोंदी करायला हँडी! सण, वार, सुट्या, गावाला जायचे प्लँनिंग, पाककला, दिन विशेष, पंचांग, मुहूर्त, पोर्णिमा, (पेक्षा) अमावस्या (!), वगैरे अनेकविध गोष्टींसाठी हमखास हक्काचा रिसोर्स!
काही वर्षांपासून बिच्चारं हद्दपार होत चाललय. दिवाणखान्यातलं अस्तित्व केव्हाच नष्ट झालय (आँड दिसतं म्हणे!), बेडरूम मधेही नाही. नाही म्हणायला स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात असावच लागत, अजूनही आपल्याला.
ओव्हरस्मार्ट मोबाईल फोनचा आणखीन एक बळी...
---
मिलिंद काळे, 9th December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment