Monday, December 14, 2015

Er Rational musings #264

Er Rational musings #264



रोड टच आहे का? पाणी? कंपाउंड? (गेटेड कम्युनिटी!), वीज? अंतर्गत रस्ते? टार रोड? अँप्रोच रोड? डिपी मधला मोठा रस्ता सँक्शनड? एन अे? इंडिव्हीज्युअल सात बारा? नदी जवळ? हिल स्टेशन जवळ? मुंबई पासून किती किमी? सोसायटी फाँर्म झालीये का? अंतर्गत स्ट्रीट लाईट/सुरक्षा व्यवस्था? लीगल आहे ना - फसवाफसवी नाहीये ना?



एक ना दोन, हजार प्रश्न, शंका, कुशंका, साशंकता. साहजिकच आहे. एकदम नँचरल. महत्वाचे. सगळेच प्रश्न विचारलेच पाहीजेत, मनाजोगं शंकासमाधान झालंच पाहीजे, आफ्टरआँल इट्स अ हार्ड अर्नड मनी, कष्टाचा पैसा.



तीन 'अे' मात्र सगळ्यात महत्वाचे.



अँफोर्डेेबिलिटी, अँप्रिसियेशन व अँमेनिटी.



आणि रोड टच नको!!!; प्रपोज्ड रोड वाईडनींग, एखादा प्रपोज्ड काँरीडाँर मध्येच नोटीफाईड झाला, तर बोंब व्हायची!



आणि नदी शेजारी, अशी अँडव्हर्टाइजमेंट (नुसती) उन्हाळ्यात बघून निर्णय घेऊ नका - पावसाळ्यात पाणी घूसेल (!!!)



आणि नदी शेजारी, अशी अँडव्हर्टाइजमेंट (नुसती) पावसाळ्यात बघून निर्णय घेऊ नका - उन्हाळ्यात पाणी नसेल (!!!)



बाकी काहीही असो लँड मधली इन्व्हेस्टमेंट तशीही हाय रिस्क, पण हाय गेन फास्ट गेन इन फास्ट लेन अशी आहे. घ्यायच्या वेळी सर्व समावेशक, डोळस, वाईज निर्णय एकदाच, सर्व विचार पूर्वक घ्या.



नंतर आपोआप पैसे वाढतात...

---

मिलिंद काळे, 15th December 2015

No comments:

Post a Comment