Er Rational musings #279
Corporate Techniques...
(Generally speaking)
"टि पी टी" technique
फर्स्ट टि
~ तेल लावून बसायच. अंगाला शक्यतो कुठलेच काम चिकटून द्यायचे नाही. सट्टक्कन् घसरले पाहीजे!
दूसरा पी
~ पलटी मारायची. जर काही चिकटलच तर मी असं बोललोच नाही, मी हे ते केलंच नाही, माझं कामच नाही, इ इ.
तिसरा टी
~ टक करायचं. जर काही चिकटलच, काही अंगावर पडलच तर काही (बरेच! का कसं ते ठरवायचं) दिवस काहीच करायचं नाही. मग अस शिताफीने (ही चालाखी बरोब्बर येते) दूसऱ्याकडे सरकवायच की बास्स!
आणि
~ मिटींग म्हणलं की नोट बूक उचलायचं आणि हजर रहायचे. आणि धीर-गंभीर मुद्रेने आविर्भावात शांतपणे ब्लेम स्टाँर्मिंग (ब्रेन स्टाँर्मिंग नव्हे) हे आद्य कर्तव्य पार पाडायचं.
नेक्स्ट लाँटमध्ये हमखास प्रमोशन...
---
मिलिंद काळे, 21st December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment