Friday, December 4, 2015

Er Rational musings #244

Er Rational musings #244



निळू फूले, मधुकर तोरडमल, अनंत जोग, रवी पटवर्धन, रमेश भाटकर वगैरे ना पडद्यावर वा स्टेज वर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा राग येतो. भूमिका कुठचीही का असेना.



ओम शिवपूरी, सत्येन कप्पू, प्रेम चोप्रा, शक्ती कपूर, मनमोहन, कादर खान, जाँनी लीव्हर वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा ओंगळपणा वाटतो. भूमिका कुठचीही का असेना.



पिंचू कपूर, प्रेमनाथ, सप्रू, रेहमान, अमरीश पूरी, प्राण, अमजद खान, रझा मुराद, जीवन वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारची जरब, भीती वाटते. भूमिका कुठचीही का असेना.



ओमप्रकाश, अशोककुमार, उत्पल दत्त, डेव्हीड, असीत सेन वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा विश्वास वाटतो. भूमिका कुठचीही का असेना.



मला कायमच ए के हनगल, राजेंद्रकृष्ण वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल की एक प्रकारची किव येते. भूमिका कुठचीही का असेना.



सईद जा़फरीं वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा खानदानी पणा जाणवतो. भूमिका कुठचीही का असेना.



देवेन वर्मा, मेहमूद, राजेंद्रनाथ, असरानी, वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा निर्भेळ आनंद मिळतो. भूमिका कुठचीही का असेना.



के एन सिंग, आय एस जोहर वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा गूढत्वाचा भास होतो. भूमिका कुठचीही का असेना.



केश्तो मुखर्जी, जाँनी वाँकर, मुक्री, पेंटल, विजू खोटे, जगदीप वगैरे ना पडद्यावर वा टि व्ही वर बघीतल्या बघीतल्या एक प्रकारचा कणव येते. भूमिका कुठचीही का असेना.



हे सगळे महान कलाकार. यांच्याबरोबर आपोआपच एक प्रकारचा कनेक्ट प्रेक्षकांना जाणवतो यातच या सर्वांचे सहजसुंदर उत्स्फूर्त अभिनय श्रेष्ठत्व सिध्द होते. यातच यांचे यश आहे!



दादा लोक्स.

---

मिलिंद काळे, 4th December 2015

No comments:

Post a Comment