Er Rational musings #277
~ कँमेरामन, फोटोग्राफर कधीच सरळ ताठ उभा राहून फोटो काढत नाही. तो सरळ तर उभा राहतो पण खांद्यावर मान तिरकी करून, एका बाजूला करून क्लिक करतो.
का, हा अनुत्तरित प्रश्नच आहे.
~ दूचाकीस्वार समोर कोणी असताना वा समोरून कोणते वाहन येताना वा डावी उजवीकडून कोणी येताना, सारखा हाँर्न वाजवतात. फार कशाला, उठसूट उगीचच हाँर्न वाजवतात.
का, हा गहन प्रश्नच आहे.
~ आणि पुण्य नगरीत (अर्थातच पूण्यात!), रविवार सकाळ ही अनुभवायची असते. सनडे ब्रेकफास्ट! इतक्या सुंदर जागा, हाँटेलं, व्हरायटी, चाँईस क्वचितच दूसरीकडे अँव्हेलेबल असेल. परंतू फक्त कोअर सिटी, क्रिमी एरीयात हां, एक्स्टेंशन वाले अेरीया नव्हे. म्हणजे कोंढवा मुंढवा ढुंढवा नऱ्हे कऱ्हे मऱ्हे पिंपळे बिंपळे किरकीट फिरकिट विश्रांत वाडी वगैरे चित्रविचित्र नावे निनावे अजगरा प्रमाणे पसरलेले भाग नव्हे...
आणि पूण्यात आपली लाडकी जवळची मित्र मंडळी पण राहतात ना?!!
---
मिलिंद काळे, 21st December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment