Er Rational musings #245
कुठे थांबायचं आणि कधी थांबायचं हे ज्याला कळले तो आयडियली ग्रेट.
कारण प्रत्येक गोष्टीच एक लिमिट असतं. काही मर्यादा असतात. एक्स्पायरी डेट पण असते! काही आमिषं असतात तर काही फसवी प्रलोभनं पण असतात. काही आपणचं निर्माण केलेली हाव असते.
हो, ह्यात नवीन काय? सोप्प आहे. पण खरच आपल्याला जमत अस वागायला?
~ लाँग, आणखी लाँग, जंप मारता मारता...
~ उंच, आणखी उंच, जंप मारता मारता...
~ फास्ट, आणखी फास्ट, धावता धावता...
~ पूढे, आणखी पूढे, जाता जाता...
पूढे आणखी पूढे, फास्ट आणखी फास्ट, उंच आणखी उंच, लाँग आणखी लाँग, हे करता करता आपला विदूषक कधी होतो तेच कळत नाही. का कठपूतळी, कोण जाणे.
हं, आता, का आणि कसं थांबायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे.
---
मिलिंद काळे, 4th December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment