Thursday, December 24, 2015

Er Rational musings #288

Er Rational musings #288



मला माझ्या शाळेतल्या ग्रूपचं भयंकर कौतुक आहे. प्रचंड अभिमान आहे. अप्रूप आहे.



ग्रूप्स सगळ्यांचेच असतात. शाळा, काँलेजेस, नोकरी, नातेवाईक, अँसाँर्टेड मित्र, व्यावसायिक वगैरे.



मुलुंडमधले आमच्याच शाळेतले सीनियर्स असो वा ज्युनियर्स, जेव्हा असं म्हणतात की मिल्या, तुमची बँच साँलिड होती ना? च्यायला, माझी छाती अभिमानाने भरून येते व मान उंचावते ना राव! पण हे त्रिवार सत्य आहे की माझी दहावीची बँच सगळ्यातच व सगळ्यांनाच भारी आहे.



एकाच वर्गातली मुले मुली (माझी दहावी 1980 सालची), एव्हढ्या डायव्हर्सिफाईड क्षेत्रांत अक्षरश: टाँप ला आहेत, असे क्वचितच असेल.



बँकिंग, वकिली, बांधकाम व्यावसायिक, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनियरिंग, गव्हर्नमेंट - प्रायव्हेट नोकऱ्या, आय टी फिल्ड, प्रयोगशील शेतकरी, इतर व्यावसायिक, कन्सल्टंटस्, शेअर मार्केट, डाँक्टर्स, चार्टर्ड अकाऊंटंटस्, कंपनी सेक्रेटरी, मरीन इंजिनियरिंग, स्ट्रक्चरल आँडिटर्स, ...ते कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, यू नेम इट, वुई हँव इट! आणि बहुतेक प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात बाप!



वामुमावी १० वी "अ" राँक्स...



आणि म्हणूनच, आमच्या 'प्रिंसेसेस' व 'सवंगड्यांच्या' नावाने 'चांगभलं' !!

---

मिलिंद काळे, 24th December 2015

No comments:

Post a Comment