Friday, December 25, 2015

Er Rational musings #291

Er Rational musings #291



चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो

अवीट चवीचा अमृततुल्य ठेवा असतो



कधीही कितीही कुठेही प्यायचा असतो

मधुर टवटवीत तरतरीत रिचवायचा असतो



कोणी म्हणे पिक्त, तर कोणी म्हणे उष्ण

नका देऊ लक्ष, मस्त पिऊया चहा धारोष्ण



हाँटेलं, टपरी, प्लँटफाँर्म, गाडी, गल्ली ते दिल्ली

गरमागरम अमृत पाणी, निरोगी रहाण्याची गुरूकिल्ली

---

मिलिंद काळे, 26th December 2015

No comments:

Post a Comment