Er Rational musings #237
~ बाबल्याने बेबलीची मारल्यान, मारल्यान...
~ मेरी तूझे केस लांब लांब लांब, येऊ नको मेरी तूझे पापा बघतात...
~ सोमवार, सोमवार मंगळवार, बुधवार, बुधवार गुरूवार, शुक्रवार, शुक्रवार शनिवार, रविवार, सोमवार...
~ जंबो जेट जंबो जेट, मुंबई लंडन प्रवास थेट, जगलो वाचलो नंतर भेट, जंबोजेट...
ही व अशीच खूप टिपी गाणी खास ट्रेकिंग वरची. मुलुंड वरून शेवटची कर्जत लोकल पकडायची, दारात बसायचे, गाणी म्हणत म्हणत नेरळ शेलू कर्जत गाठायचे, स्टेशन वर चहा सिगारेट मारायच्या, (मी स्टेशन स्टाँल वरच्या काचेच्या प्लास्टिक च्या बरणीत ठेवलेले (बुरशी आलेले!) बुंदीचे मोतीचूराचे लाडू आवडीने खायचो!), मग मार्गक्रमण सुरू, तंगडतोड, कधी टमटम, कधी लाल पिवळी एसटी, मग पायथा, मग चढाई...मजा करत करत थांबत थांबत टाँप ला पोहचणे. गप्पा टप्पा मारत मारत. एक मित्र नेहमी नवीन मेंबर ला विचारायचा की तू घोडा का हत्ती? अर्थ असा की घोड्याप्रमाणे टाँक टाँक फास्ट का हत्ती प्रमाणे स्लो चढणारा आहे?! वर पोचल्यावर बिड्या. वर सिगारेट नाही तर बिडी ओढायची असा आमचा नियम. मग बरोबर आणलेले खायचे. परतीचा उतरणीचा प्रवास. रिटर्न ट्रेन फ्राँम कर्जत. परत डब्यात बसून जोरजोरात गाणी भेंड्या वगैरे. रात्री घरी. दमून भागून.
कधी कर्जत साईड वाले ईर्शाळ, माणिकगड, प्रबळ गड डोंगरमाथे तर कधी पूढे खंडाळा लोणावळा मळवली वगैरे तर कधी कसारा शहापूर साईड. पावसाळ्यात वेगळीच धमाल.
दारू मात्र गडांवर वर्ज्य, अँब्सोल्यूटली कधीही ट्रेकवर डोंगरांवर गडांवर दारू नाही प्यायलो, एक्सेप्ट नेरळ माथेरान चालत चढता जाता येता उतरताना; येथे मोहाची पण मिळायची. मजा यायची.
पराग सहस्रबूध्दे हा माझा चांगला मित्र. अतिउत्तम प्रोफेशनल माऊंटेनियर. हा सूरेंद्र चव्हाण, रिषीकेश यादव यांच्या बरोबर एव्हरेस्ट एक्स्पिडीशन मध्ये होता, 1998 साली बेस कँप च्या ही वर कँप 2 पर्यंत पोचल्यावर लिडर रिषीकेश च्या निर्णयानुसार सुरेंद्र चव्हाण एव्हरेस्ट वर पोचला, नाहीतर परागच गेला असता. काही वर्षांनी अशा माझ्या या लाडक्या मित्राचे ङोंगरातच शेकडो फूट दरीत कोसळून अपघाती निधन झाले.
त्याच्याच आठवणींचा उजाळा.
फाँड मेमरीज!
A MEMOIR
---
मिलिंद काळे, 2nd December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment