Thursday, December 10, 2015

Er Rational musings #258

Er Rational musings #258



कष्टकरी



भाजीवाला, फळवाला, भेलपूरी, पानीपूरी वाला, इस्त्रीवाला, दूधवाला, रिक्शावाला, टँक्सीवाला, चहा टपरी वाला, पावभाजी वाला, मच्छी वाला, हातगाडी वाला, भंगारवाला, कुल्फीवाला, सरबत गोळा वाला, बूट पाँलिश वाला, सलून वाला, इ इ (बहुतांशी भैये उत्तर भारतीय) व पंक्चरवाला, नारीयल पानी वाला, इडली डोसा सांबार वाला, इ इ (बहुतांशी साऊथ इंडियन मल्लू अण्णा) व फरसाणवाला, दाबेलीवाला, इ इ (बहुतांशी गुजराती राजस्थानी मारवाडी) व

चायनीज वाला, बूर्जी वाला, इ इ इ (अँसाँर्टेड).



या व अशाच सर्व कष्टकऱ्यांच्या मांदीयाळीत काही मराठी कष्टकरी आहेत, नाही असे नाही, परंतु, हे व्यवसाय सुध्दा काही प्रमाणात "परप्रांतियांच्या" हातात गेलेत. उदाहरणार्थ पेपर वाला, वडापाव वाला, चांभार, ऊसाचा रस वाला, इ इ.



मराठी मक्तेदारी फक्त दोघांतच



एक: माथाडी कामगार

दूसरा: मुंबई चा डब्बावाला



आता आपले जीवनमान उंचावलय, का आपल्याला कमीपणा वाटतो, का आपण आता या व अशाच व्यवसायांचे यांचे मालक झालोय व यांना कामाला ठेवलय, का आपल्याला काम मिळत नाही, का आपण जास्त अँम्बिशस झालोय, का आपल्याला शिरकाव करता येत नाही, का आपल्याला गरज नाही?!



हा एक संशोधनाचा विषय आहे.

---

मिलिंद काळे, 10th December 2015

No comments:

Post a Comment