Er Rational musings #246
सर्वांत जास्त इंपेशंट वा इरिटेटिंग केव्हा होतं माहितीये?
~ जेव्हा तूम्ही एखाद्या लाल रंगाच्या स्विफ्ट किंवा सँन्ट्रो किंवा तत्सम गाडी पाठी जाताय. रस्ता मोकळा आहे, तरीही कार चा स्पीड 20-30! व रस्त्याच्या मध्यातून जातीये, साईड पण देत नाहीये. कधी एकदा ओव्हरटेक करतो असं होत. आपण हाँर्न वाजवतो, लाईट चा अप्पर डिप्पर सिग्नल देतो, पण ढिम्म. मनातल्या मनात व ओठांवर पुटपुटत आपण शेलक्या शिव्या हासडतो, ड्रायव्हरचा उद्धार करतो व कसेबसे रिस्क घेत ओव्हरटेक करण्यात यशस्वी होतो. बघतो तर काय, एकतर बाई गाडी चालवत असते (!), (मग ठीक आहे - एक्स्पेक्टेड!) किंवा एखादा मूर्ख माणूस मोबाईल कानाला लावून गाडी चालवत असतो!
तेव्हा...
~ हे सगळं सेम, पण एखाद्या (गिरहाईक शोधणाऱ्या) रिक्शा पाठी पण अनुभवायला मिळतं.
तेव्हा..
~ लाईन मध्ये उभे असताना लोक्स शांतपणे उभे रहात नाहीत. एकजण डाव्या बाजूला, एक दोघे मधेच उजव्या बाजूला झुकताहेत, रेस्टलेस. चूळबूळ सुरूच असते. एका पाठोपाठ एक उभं रहायला काय लाज वाटते का काय कोण जाणे.
बरं, जर नीट उभे असतील तरी पाठी जागा असताना सुध्दा असे चिकटतात की ज्याचे नाव ते!
तेव्हा...
~ जेव्हा तूम्ही तिकीटाच्या रांगेत उभे असता. एखादा सोंड्या किंव एखादी जादा शहाणी बाई खिडकी जवळच्यांना त्याची/तीचीे तिकीटं काढण्यास पटवतो, आपले पैसे देतो/पटवते आपले पैसे देते व ते तिकीटं मिळाल्यावर विजयी मुद्रेने जग जिंकल्यासारख तोऱ्यात मिरवत निघून जातात.
तेव्हा...
~ जेव्हा तूम्ही तिकीटाच्या (किंवा फाँर दँट मँटर कुठल्याही) रांगेत उभे असता. बाजूची लाईन फास्ट(च) पूढे सरकत असते. तेव्हा...
~ टोल नाक्यावर, लिफ्टची वाट बघताना, पेट्रोल पंपावर इ ठिकाणी रांगेत उभे असताना हमखास काही मठ्ठ निर्बुध्द महाभाग पूढे पूढे जायचा प्रयत्न करतात.
तेव्हा...
---
मिलिंद काळे, 5th December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment