Er Rational musings #278
यत्र तत्र सर्वत्र जिवाचे मैत्र
फरकच न पडता तीळमात्र
सकाळ, दूपार, संध्याकाळ वा रात्र
नसे वर्ज्य आम्हा कोठलेच सत्र
असतो आम्ही अस्त व्यस्त मस्त
कधी उणे, कमी अधिक वा जास्त
कधी होतो पोस्ट्स चा रतीब फस्त
ना कळे काळ वेळ वा लागता उसंत
तूमचे चालू दे, म्हणो काही दोस्त
"ग्रूपीक" एकीवर सगळ्यांचीच भिस्त...
---
मिलिंद काळे, 20th December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment