Er Rational musings #265
चहा
चहाचे चांगले परिणाम....
१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणाऱ्या सद् गृहस्थांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. त्यांना उत्तम भूक लागून झोपही छान लागते.
२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्या व्यक्ती किंवा सतत फिरणारे व्यावसायिक, यांची गोड बोलण्याची सवय अंगवळणी पडते.
३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीमूळे अविस्मरणीय आनंद मिळतो. अतिरिक्त क्षार नाहीसे होतात.
४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा तरतरी वाढवणारा व बुध्दिला चालना देणारा आहे.
५. टपरीवर चहा अॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्कामूळे चहाची चव शतपटीने वाढते.
६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (7 रू/कटिंग चहा असे) वर्षाचे 5110 रू होतात. ५ वर्षाचे 25550 रू होतात.
७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही, कितीही, कुठेही फार प्यायचे पेय आहे.
८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो मनामध्ये एक प्रकारच्या सळसळत्या आनंदलहरी निर्माण करतो. चहा रक्ताची घनता वाढवतो.
९. नियमित चहा पिण्याने हाडे मजबूत होतात, रक्तवाहिन्या प्रसरण पावून रक्तदाब नियमित रहातो आणि आम्लपित्ताचा त्रास नाहीसा होतो.
१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहाला एक खारट गोड चव प्राप्त होते व चव एक वेगळीच उंची गाठते.
खरे पाहिले तर 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक नसून दोघेही एकमेकांस पूरक आहेत. द टेस्टस काँम्प्लिमेंट इच आँदर!!
पण दारू बदनाम आहे चहा नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
पण त्याविषयी नंतर कधीतरी...
🏆 🍵
---
मिलिंद काळे, 15th December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment