Wednesday, December 2, 2015

Er Rational musings #236

Er Rational musings #236



मार्केट मधे काही विक्रेते लक्ष वेधून घेतात.



~ उंच काठी घेऊन फूगे फुगवणारा, विकणारा.

~ दोन तीन काठ्या घेऊन त्याच्यावर निरनिराळी छोटी वाऱ्यावर फिरणारी चक्रे विकणारा.

~ बांबूवजा काठी घेऊन चिक्कट चूईंगगम विकणारा.

~ दोन्ही हातांवर, खांद्यांवर, इव्हन डोक्यावर ठेवलेल्या पिशव्या, कापडं, कि चेन्स, साखळ्या, बटवे, कंगवे, पिना, शिट्या इ इ तर्हतह्रेच्या वस्तू विकणारा.

~ पांगुळगाडीवजा काठी घेऊन ऊंदीर मारण्याची औषधे, किटकनाशके, विषारी गोळ्या वगैरे विकणारा.



कसं असेल यांच आयुष्य? किती कमवत असेल? कूठे रहात असेल? घरी किती जण कोणकोण असतील? दिवसभर ऊन पाऊस थंडीची पर्वा न करता फिरताना यांच्या पायांचं, बोलून बोलून तोंडाचं व वाजवून वाजवून गळ्याचं काय होत असेल? ?  ?  ?



प्रश्न. दाहकता. वास्तव. की नशीब. प्राक्तन. भोग.



आपल्या सुजाण व सशक्त परिपक्व लोकशाहीने सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत.



सहावा - आता सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा, नियमित ठरावीक कामाचे तास, किमान वेतन कायदा, संघटीत असंघटित कामगार संघटना, काम बंद आंदोलनं, संप, निषेध, मोर्चा, उपोषण, मागण्या, निर्णय, अंमलबजावणी!  !  !  !



मी, माझं, माझ्यासाठी, माझ्याकडे, माझ्यापुरतं!?



मी माझं, माझा मी, मी, मी, मी...



खरंच एव्हढा कोतेपणा, खुजेपणा पुरेसा आहे / योग्य आहे?

---

मिलिंद काळे, 2nd December 2015

No comments:

Post a Comment